esakal | लहान मुलांसाठी कधी येईल कोरोनावरील लस? सीरम इन्स्टिट्यूट-भारत बायोटकने दिली माहिती

बोलून बातमी शोधा

child vaccination.}

लहान मुलांना कोरोनाची लस केव्हा देण्यात येईल याबाबत प्रश्व उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार लहान मुलांना कोविड-19 लस उन्हाळ्याच्या शेवटापर्यंत मिळू शकते.

लहान मुलांसाठी कधी येईल कोरोनावरील लस? सीरम इन्स्टिट्यूट-भारत बायोटकने दिली माहिती
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. याअंतर्गत सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस देण्यात आली. त्यानंतर 1 मार्च पासून 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे वयस्तर व्यक्ती आणि असाध्य आजार असणारे 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. लहान मुलांना कोरोनाची लस केव्हा देण्यात येईल याबाबत प्रश्व उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार लहान मुलांना कोविड-19 लस उन्हाळ्याच्या शेवटापर्यंत मिळू शकते. लहान मुलांवर कोरोनावरील लशीचे परिक्षण करणाऱ्या कंपन्यांचा सुरुवातीचा डेटा जून-जूलैपर्यंत येण्याची आशा आहे. सांगितल जातंय की, डेटा उपलब्ध होताच कंपन्या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी सरकारकडे अर्ज करु शकतात. परवानगी मिळाल्यास लसीकरणास सुरुवात होईल.

ऑक्सफर्ड लस चाचणीचे मुख्य संशोधन अॅड्र्यू पोलार्ड यांच्यानुसार, आतापर्यंत मुलांवर कोरोना विषाणूचा प्रभाव पाहायला मिळालेला नाही. पण मुलांमध्ये या विरोधात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होणे आवश्यक आहे. भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत लस येण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने फेब्रुवारीमध्ये म्हटलं होतं की, ऑक्टोबरपर्यंत मुलांना देण्यात येईल अशी कोरोनावरील लस तयार करतील. कंपनीचे आयात-निर्यात अधिकारी पीसी नांबियार यांनी सांगितलं की, मुलांचा जन्म झाल्यानंतर त्यांना एका महिन्याच्या आत कोरोनावरील लस दिली जाईल. सीरम इन्स्टिट्यूट लस औषध स्वरुपात देखील आणणार असल्याचं म्हटलं आहे. 

Lockdown: मुंबई जवळच्या 'या' जिल्ह्यात लॉकडाऊन, वाचा सविस्तर बातमी

स्वदेशी भारत बायोटेकला देखील 5 ते 18 वर्षे वयाच्या मुलांवर कोरोना लसीच्या चाचणीसाठी मंजुरी मिळू शकते. भारत बायोटेकने नुकत्याच जारी केलेल्या माहितीनुसार कंपनीची लस 81 टक्के प्रभावी आढळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकची कोरोनावरील लस टोचून घेतली होती. त्यामुळे भारत बायोटेकच्या लशीबाबत लोकांमध्ये विश्वास निर्माण झाल्याचे दिसत आहे. 

शेतकरी आंदोलनावर ब्रिटनच्या संसदेत चर्चा; भारताने व्यक्त केली नाराजी

जगभरात लहान मुलांना देता येईल, अशा कोरोनावरील लशींचा शोध लावला जात आहे. अमेरिकीच्या दोन कंपन्या फायझर-बायोएनटेक आणि मॉडर्ना 12 ते 15 वर्षे वयांच्या मुलांवर तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण घेत आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीही लहान मुलांसाठी कोरोनावरील लस निर्माण करण्याच्या कार्याला लागली आहे. अमेरिकेमध्ये येत्या दोन महिन्यात लहान मुलांना लस मिळू शकते.