esakal | कोरोना संकटात बुद्ध विचारातूनच जगातील देश एकत्र: PM नरेंद्र मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना संकटात बुद्ध विचारातूनच जगातील देश एकत्र: PM नरेंद्र मोदी

कोरोना संकटात बुद्ध विचारातूनच जगातील देश एकत्र: PM नरेंद्र मोदी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : कोरोनारूपाने मानवतेसमोर तसेच संकट उभे ठाकले आहे. अशावेळीही भगवान बुद्ध प्रासंगिक ठरतात. बुद्धाच्या मार्गावरून चालत आपण मोठ्या आव्हानावर कशी मात करू शकतो, हे भारताने आज करून दाखवले आहे. बुद्धाचेच सम्यक विचार मनात घेत आज जगातील इतर देशही एकमेकांची साथ देत आहेत, एकमेकांची ताकद बनत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि आषाढ पौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आपण आज गुरूपौर्णिमा देखील साजरी करतो. आजच्या दिवशीच भगवान बुद्धांनी बुद्धप्राप्तीनंतर आपले पहिले ज्ञान जगाला दिले होते. आपल्याकडे म्हटले जाते, जिथे ज्ञान आहे तिथेच पूर्णत्व आहे आणि तीच पौर्णिमा आहे. जेव्हा उपदेश देणारे स्वतः बुद्ध असतील, तर हे ज्ञान संसाराच्या कल्याणाचा पर्याय ठरेल.’’

हेही वाचा: दोन डोसवर थांबता येणार नाही; बुस्टर डोसची गरज भासणार : AIIMS

गौतम बुद्ध बोलतात, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ते धम्मचक्र प्रवर्तन असते. संपूर्ण जग त्यांच्या शब्दांचे, ज्ञानाचे अनुयायी झाले आहेत. बुद्धाच्या विचारांवर आस्था ठेवणारे असंख्य लोक आहेत. सारनाथ इथे भगवान बुद्धाने संपूर्ण जीवनाचे, संपूर्ण ज्ञानाचे सार आपल्याला सांगितले होते. त्यांनी दुःखाविषयी सांगितले होते, दुःखाचे कारण सांगितले होते. दुःखांवर विजय मिळवता येतो, असेही आश्वस्त केले आहे आणि विजयाचा मार्गही सांगितला होता,’’ असे त्यांनी सांगितले. भगवान बुद्धांनी आपल्याला जीवनातील अष्टांग सूत्रे, हे आठ मंत्र दिले. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक मन आणि सम्यक समाधी म्हणजेच मनाची एकाग्रता. मन, वाणी आणि संकल्पात, आपल्या कर्मात आणि प्रयत्नांत जर हे संतुलन असेल, तर आपण दुःखापासून बाहेर येत प्रगती आणि सुख मिळवू शकतो. हेच संतुलन आपल्याला आपल्या उत्तम काळात लोककल्याणाची प्रेरणा देते आणि कठीण, संकट काळात संयम, धीर धरण्याची ताकद देते, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: JEE 2021: पूरस्थितीमुळं परीक्षेला मुकलेल्यांना मिळणार पुन्हा संधी

वैर मोठ्या मनाने, प्रेमाने शांत होते

एका धम्मपदाचा दाखल देत मोदी म्हणाले, ‘‘वैराने वैर शांत होत नाही. तर वैर मोठ्या मनाने, प्रेमाने शांत होऊ शकते. विशेषतः संकट काळात जगाने नेहमीच या प्रेमाच्या सौहार्दाच्या शक्तीचा अनुभव घेतला आहे. बुद्धाचे हे ज्ञान, मानवतेचा हा अनुभव जस जसा अधिक समृद्ध होत जाईल, तसतसे जग अधिक यश आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर पोहोचेल.’ आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघाने सुरू केलेल्या 'केअर विथ प्रेअर' या उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली.

loading image
go to top