esakal | JEE 2021: पूरस्थितीमुळं परीक्षेला मुकलेल्यांना मिळणार पुन्हा संधी
sakal

बोलून बातमी शोधा

JEE Main

JEE 2021: पूरस्थितीमुळं परीक्षेला मुकलेल्यांना मिळणार पुन्हा संधी

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आलेल्या अभूतपूर्व पूरस्थितीमुळं ज्या विद्यार्थ्यांना जेईई मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या सत्राला मुकावं लागलं त्यांनी निराश होण्याची गरज नाही. कारण पूरस्थितीमुळं जे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाहीत, त्यांना पु्न्हा संधी मिळणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही घोषणा केली.

धर्मेंद्र प्रधान म्हणाले, "महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळं निर्माण झालेली पूरस्थिती आणि विविध भागांमध्ये घडलेल्या दरड कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांना जेईईची परीक्षा देता आली नाही, त्यांना मदत केली जाईल. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीला (NTA) मी सूचना केलीए की या विद्यार्थ्यांना दुसरी संधी देण्यात यावी"

हेही वाचा: मोठी घोषणा! तळीये गाव म्हाडा वसवणार - गृहनिर्माण मंत्री आव्हाड

पूरस्थितीमुळं कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, सांगली आणि सातारा या भागातील विद्यार्थी २५ आणि २७ जुलै रोजी जेईई मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या सत्रासाठी संबंधित केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. या विद्यार्थ्यांनी घाबरुन जाण्याचं कारणं नाही. त्यांना आणखी एक संधी देण्यात येईल, त्यासाठी NTAकडून तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असंही प्रधान यांनी म्हटलंय.

loading image
go to top