Omicron: केंद्राचं राज्यांना पत्र; वाढत्या कोरोनाबाबत व्यक्त केली चिंता

Corona positive
Corona positivesakal media

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज शनिवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोनाविरोधातील लढाईसंदर्भात काही मुद्दे मांडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे की, अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संक्रमण दर सातत्याने वाढतो आहे. सोबतच कोरोनामुळे होणारे मृत्यू देखील चिंतेचं कारण बनले आहे. मंत्रालयाने कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, जम्मू-काश्मीर, ओडिसा आणि मिझोरामला यासंदर्भात पत्र लिहून आवश्यक ती पावलं उचलण्यास सांगितलं आहे.

Corona positive
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन

मंत्रालयाने म्हटलंय की, सर्व राज्यांनी टेस्ट-ट्रॅक-ट्रीट- व्हॅक्सीनेट या कोरोना प्रोटोकॉलवर योग्यपद्धतीने लक्ष द्यावं. सोबतच सांगण्यात आलंय की, लवकरात लवकर कोरोनाचा प्रसार रोखणे आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जावीत. आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय की, हे पत्र काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या, साप्ताहिक संक्रमणाचा दर आणि साप्ताहिक मृत्यू देखील वाढले आहेत, त्यामुळे पाठवण्यात आलंय.

Corona positive
9 वर्षाच्या मुलाकडून सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल | Delhi

ओमिक्रॉनच्या धोक्यादरम्यान 27 नोव्हेंबर रोजी लिहलेल्या एका पत्राचा हवाला देताना आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना म्हटलंय की, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये कसलीही ढिलाई होऊ नये. हॉटस्पॉट तातडीने ओळखण्यात यावेत. संक्रमित लोकांना लवकरात लवकर ओळखून त्यांना आयसोलेट करण्यात यावं. सोबतच संक्रमितांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात यावेत. तसेच आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com