esakal | राष्ट्रपती राजवटीसाठी भाजपची खेळी; बिहारमधील निवडणुकीवर कोरोनामुळे टांगती तलवार 
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

नितीश कुमार हे या भेटीसाठी अनुकूल नव्हते आणि राज्य सरकारने कोणत्याही केंद्रीय पथकाला राज्यात पाठविण्याची मागणीही केली नव्हती. या सर्व घडामोडींवर भाजप राज्यात दुहेरी खेळी खेळत असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रपती राजवटीसाठी भाजपची खेळी; बिहारमधील निवडणुकीवर कोरोनामुळे टांगती तलवार 

sakal_logo
By
उज्ज्वल कुमार -सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा - बिहारमध्ये कोरोनाचा प्रसार वाढला असून त्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होऊ शकेल का, असा सवाल राजकीय क्षेत्रांत सध्या विचारला जात आहे. सर्व विरोध पक्षांच्या सूर निवडणूक पुढे ढकलावी असा असून सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू) - भाजप सरकार मात्र निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. 

निवडणूक टाळण्याच्या नावाखाली भाजप राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विचार करीत असल्याचीही चर्चा आहे. असे केल्यास प्रशासकीय यंत्रणेवर भाजपचे नियंत्रण येईल आणि त्यानुसार पक्षाच्या देखरेखीखाली निवडणुका घेतल्या जातील. भाजप अशी दुहेरी खेळी खेळण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. बिहार विधानसभेत २४३ सदस्य असून तिची मुदत २९ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यापूर्वी निवडणूक होणे घटनेनुसार आवश्‍यक आहे. निवडणूक आयोगही निवडणुकीची तयारी करीत आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बिहारमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने नुकताच राज्याता दौरा केला. मुख्यमंत्री नितीश कुमार हे या भेटीसाठी अनुकूल नव्हते आणि राज्य सरकारने कोणत्याही केंद्रीय पथकाला राज्यात पाठविण्याची मागणीही केली नव्हती. या सर्व घडामोडींवर भाजप राज्यात दुहेरी खेळी खेळत असल्याची चर्चा आहे. 

सध्या कोरोनाला प्राधान्य - मोदी 
बिहारमध्‍ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने विधानसभा निवडणुकीवर टांगती तलवार आहे. निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी विरोधक आधीपासूनच करीत आहे. मात्र कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हातातील सत्तेची दोरी सैल झाल्याचा त्याचा राजकीय फायदा उठवण्याच्या तयारीत भाजप आहे, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. 

दिल्लीकर हर्ड इम्युनिटीच्या जवळ! इतके टक्के लोकांना झालाय आतापर्यंत कोरोना