
नवी दिल्ली - कोरोनामुळे होत असलेल्या आर्थिक हानीचा अंदाज काढण्याचे प्रयत्न जगभरात सुरु आहेत. या विषाणूने जवळपास प्रत्येक क्षेत्राला दणका दिला आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रालाही याची झळ बसली असून प्रत्येकी दीडशे कोटींहून अधिक किमतीचे तब्बल ४०१ प्रकल्प रखडले आहेत. यामुळे त्यांचा खर्च चार लाख कोटी रुपयांनी वाढला आहे.
प्रकल्प आणि विलंब...
५८३ विलंब झालेल्या प्रकल्पांपैकी
३९.४० महिने सरासरी झालेला विलंब
१८३ प्रकल्पांना एक वर्षापर्यंत विलंब
१२९ प्रकल्पांना दोन वर्षांपर्यंत विलंब
१४६ प्रकल्पांना पाच वर्षांपर्यंत विलंब
१२५ प्रकल्पांना पाच वर्षांहून अधिक विलंब
प्रकल्प आणि किंमत...
१७०१ - एकूण प्रकल्प
२०,६५,७३९ कोटी रुपये - एकूण मूळ खर्च
४०१ - प्रकल्पांचा खर्च वाढला
२४,७१,९५४.७८ कोटी रुपये - सध्या येणारा अंदाजित खर्च
१९.६६ टक्के - खर्चात झालेली वाढ
१०,८९,१७८.११ कोटी रुपये - डिसेंबर २०१९ पर्यंत झालेला खर्च
विलंबाची कारणे
जमीन अधिग्रहण, वन खात्याकडून परवानगीला उशीर आणि मालाचा पुरवठा वेळेत न होणे ही प्रमुख कारणे. याशिवाय निधीची कमतरता, भौगोलिक अडचणी, कामाती संथपणा, कामगारांची कमतरता, कंत्राटदारांचा आळस. नक्षलवाद्यांकडून अडथळे, न्यायालयीन खटले, कंत्राटी कामगारांचे प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.