esakal | देशात मजुरी करतो हाच आमचा दोष, राऊतांचा मोदी सरकारला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

 coronavirus, lockdown, maharashtra, shiv sena leader, sanjay raut,Modi Government

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ता आणि खासदार संजय राऊत त्यांच्या ट्विटमुळे चांगलेच चर्चेत असतात. सोशल मीडियातील सक्रियेतून ते अनेकदा मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसते. मोदी सरकारच्या आणखी एका दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका फोटोच्या माध्यमातून मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. Shivsena नेते संजय राऊत अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या  फोटोमध्ये 'वन्दे मातरम मिशन' अशी ओळ लिहिललेले एक विमान दिसते. या विमानाकडे पाहत रेल्वेच्या पटरीवरुन चालणाऱ्या मजूरांची व्यथा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

देशात मजुरी करतो हाच आमचा दोष, राऊतांचा मोदी सरकारला टोला

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ता आणि खासदार संजय राऊत त्यांच्या ट्विटमुळे चांगलेच चर्चेत असतात. सोशल मीडियातील सक्रियेतून ते अनेकदा मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसते. मोदी सरकारच्या आणखी एका दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका फोटोच्या माध्यमातून मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. Shivsena नेते संजय राऊत अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या  फोटोमध्ये 'वन्दे मातरम मिशन' अशी ओळ लिहिललेले एक विमान दिसते. या विमानाकडे पाहत रेल्वेच्या पटरीवरुन चालणाऱ्या मजूरांची व्यथा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

...अखेर डॉक्टरांना ते दोन्ही शवं पुन्हा नेऊन दुसऱ्या स्मशानभूमीत अंत्यविधी उरकून घ्यावा लागला

कोरोना विषाणूमुळे (coronavirce) देशव्यापी लॉकडाउनच्या (lockdown in india)संकटजन्य परिस्थितीत देशभरातील विविध राज्यात अडकलेल्या मजूरांच्या समस्येकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप यापूर्वी विरोधकांकडून करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या निर्णयानंतर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने मजूरांनी पायी चालत आपल्या घरची वाट धरल्याची अनेक वृत्तही प्रसिद्ध झाली.

बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती? वाचा

जीवघेण्या आजारातून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा नियमाचे पालन व्हावे याला कुणाचेही दुमत नाही. मात्र या काळात मजूरांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असा सूर विरोधकांतून पाहायला मिळाला. मजूरांना घरी पोहचवण्यासाठी काँग्रेसने काही सूचनाही केंद्र सरकारला दिल्या. पण या सूचनांकडे ज्यापद्धतीने पाहायला हवे त्या पद्धतीने पाहिले गेले नाही, असाही आरोप झाला. पायपीट करताना अनेक जणांनी आपला जीवही गमावला. 

आईच्या दुधापासून तयार होऊ शकते कोरोनाच्या अँटीबॉडीज

दरम्यान लॉकडाउनच्या काळात परदेशातून अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी मोदी सरकारने खास प्लॅन आखल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत परदेशातील मजूरांना आणण्याला प्राधान्य दिले जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता. याच अनुषंगाने संजय राऊत यांनी हा फोटो शेअर करुन मोदी सरकारवर निशाणा साधल्याचा अर्थ काढण्यात येत आहे. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर जो फोटो शेअर केला आहे त्यातील मजूरांच्या भावना काय आहेत, हे सांगण्याचा प्रयत्नच केल्याचे दिसते. आम्ही आमच्या देशात मजूरी करतोय हाच आमचा दोष आहे, अशी ओळ मजूरांना उद्देशून फोटोमध्ये टाकण्यात आली आहे.