धक्कादायक ! मध्यप्रदेशात बीएसएफच्या जवानाला कोरोनाची लागण 

वृत्तसेवा
रविवार, 29 मार्च 2020

मध्यप्रदेशात एका बीएसएफच्या जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना धक्कादायक असून लागण झालेल्या जवानासोबत असलेल्या 50 इतर जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या बीएसएफमधील डॉक्टरांच्या निगराणीखाली या जवानांवर उपचार सुरु आहेत.

भोपाळ : मध्यप्रदेशात एका बीएसएफच्या जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना धक्कादायक असून लागण झालेल्या जवानासोबत असलेल्या 50 इतर जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या बीएसएफमधील डॉक्टरांच्या निगराणीखाली या जवानांवर उपचार सुरु आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाची लागण झालेल्या जवानाची पत्नी नुकतीच लंडनवरुन भारतात परतली होती. त्यामुळे पत्नीद्वारे या जवानाला कोरोनाची लागण झाली असल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. मध्य प्रदेशच्या ग्वालियर जिल्ह्यात टेकनपूर येथे या बीएसएफ जवानांचे आधुनिक ट्रेनिंग सेंटर आहे. या सेंटरमधील जवानाची तपासणी केली असता त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

धक्कादायक ! दारुच्या तुटवड्यामुळे केरळमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात वाढ

दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा एक हजाराच्या वर गेला असून ही भारतासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. सध्या भारतात कोरोनाची कम्युनिटी लागण होण्याची शक्यता असून देशात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाची लागण अधिकांना होऊ नये यासाठी मोदींनी देशात 21 दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona infected to bsf soldier in madhya pradesh