esakal | Video: गुजरात मॉडेलच्या चिंधड्या; हॉस्पिटलबाहेर अ‍ॅम्ब्युलन्सची भली मोठी रांग!
sakal

बोलून बातमी शोधा

Gujrat_Ambulance

अहमदाबाद, सूरत आणि राजकोट या प्रमुख शहरांत रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 

Video: गुजरात मॉडेलच्या चिंधड्या; हॉस्पिटलबाहेर अ‍ॅम्ब्युलन्सची भली मोठी रांग!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

Corona Update: अहमदाबाद : देशाच्या विविध भागात कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला आहे. त्याचा परिणाम आता हॉस्पिटलवर होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी हॉस्पिटमध्ये बेड उपलब्ध होईनात, त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला आहे, तो पाहिल्यानंतर तुम्हाला याची कल्पना येईल. हॉस्पिटलमध्ये भरती होण्यासाठी रुग्णांना वाट पाहावी लागत आहे. हॉस्पिटल बाहेर रुग्णांना घेऊन आलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सची भली मोठी रांग लागली असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. 

गुजरातमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्याचा परिणाम हॉस्पिटलवर होऊ लागला आहे. अहमदाबादमधील एका सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर अ‍ॅम्ब्युलन्सच्या रांगा लागल्या आहेत. रुग्ण हॉस्पिटमध्ये भरती होण्याची वाट पाहत आहेत. जवळपास १२०० बेड्सचं हे हॉस्पिटलही फुल्ल झालं आहे. त्यामुळं अ‍ॅम्ब्युलन्समध्येच रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट; रुग्णसंख्या दीड लाखाच्या वरच​

सध्या देशभरातील महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, केरळ आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात गुजरातमध्ये ६०२१ रुग्ण आढळले असून ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद, सूरत आणि राजकोट या प्रमुख शहरांत रुग्ण संख्या वाढू लागली आहे. 

सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र; तीन प्रमुख मुद्द्यांकडे वेधलं लक्ष​

कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने गुजरात उच्च न्यायालयाने विजय रुपाणी सरकारला धारेवर धरले आहे. सध्या देशात सर्वात जास्त लस पुरवठा गुजरातला होत असल्याचे माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या आकडेवारीवरून दिसून येते. त्यानंतरही कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. गुजरात मॉडेलची देशभरात चर्चा सुरू असताना या व्हिडिओमुळे पितळ उघडे पडले आहे. गुजरात सरकारच्या कामगिरीमुळे तेथील जनता चिंताग्रस्त होत चालली आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image