esakal | सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट; रुग्णसंख्या दीड लाखाच्या वरच
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Patients

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच प्रमुख पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मतं आहे.

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट; रुग्णसंख्या दीड लाखाच्या वरच

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Coronavirus Updates: नवी दिल्ली/पुणे : सोमवारी (ता.१२) आतापर्यंतची सर्वोच्च रुग्णसंख्या नोंदवल्या गेल्यानंतर मंगळवारी (ता.१३) ही संख्या थोडी घटल्याचे दिसून आले. गेल्या २४ तासात देशभरात सुमारे १ लाख ६१ हजार ७३६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ झाली आहे. सोमवारी दिवसभरात ८७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख ७१ हजार ५८ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. 

सध्या देशभरात १२ लाख ६४ हजार ६९८ लोक कोरोनाने ग्रस्त आहेत. आतापर्यंत १ कोटी २२ लाख ५३ हजार ६९७ जणांना कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १० कोटी ८५ लाख ३३ हजार ८५ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.

सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र; तीन प्रमुख मुद्द्यांकडे वेधलं लक्ष​

आतापर्यंत २५ कोटी ९२ लाख ७ हजार १०८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोमवारी दिवसभरात १४ लाख १२२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान सोमवारी देशभरात २४ तासात १ लाख ६८ हजार ९१२ कोरोना रुग्ण आढळून आले होते. १८ ऑक्टोबरनंतरची ही उच्चांकी नोंद ठरली. 

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच प्रमुख पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मतं आहे. त्यादृषीने देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. पण, देशातील अनेक राज्यांनी लशींची कमतरता जाणवत असल्याची तक्रार केली आहे. अशात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

उधमसिंह यांनी जनरल डायरचीच हत्या केली होती का?​

भारत सरकारने रशियाच्या 'स्पुटनिक' लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. देशात सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीचा वापर सुरु आहे. ४५ वर्ष वयापुढील सर्व व्यक्तींना कोरोनावरील लस दिली जात आहे. पण, लशीच्या पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. लशींची चणचण जाणवत असताना देशाला स्पुटनिक लस मिळाल्यास मोठी मदत होणार आहे. 

स्पुटनिक लस ९० टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे कोरोना विषाणूविरोधात लढणारी पहिली लस रशियाने तयार केली होती. रशियाने अगदी कमी वेळात स्पुटनिक लस बाजारात आणल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर शंका घेण्यात आली होती. पण, रशियाने शोध निबंध प्रकाशित शंका दूर करण्याचा प्रयत्न केला होता. 

सीआरपीएफने आठ जणांना मारायला हवे होते; भाजप प्रदेशाध्यक्षाचं खळबळजनक वक्तव्य​

भारतात जगातील सर्वात मोठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सध्या सुरु आहे. लसीच्या नव्या टप्प्यांमध्ये लस घेणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लसींचा तुटवडा भासत असल्याचं चित्र आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इतर लस निर्मितींचा वेग वाढवण्यावर भर दिला आहे. दरम्यान, उच्चपदस्थ सरकारी सुत्रांच्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत भारतात आणखी पाच कंपन्यांची लस दाखल होणार आहे. त्यातच रशियाच्या 'स्पुटनिक व्ही' या लशीला भारतात आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top