esakal | सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र; तीन प्रमुख मुद्द्यांकडे वेधलं लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia_Gandhi_PM_Modi

लस ही सध्याची सर्वात मोठी आशा आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट ही की, बहुतेक राज्यांमध्ये तीन ते पाच दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक आहे.

सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र; तीन प्रमुख मुद्द्यांकडे वेधलं लक्ष

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या (Corona virus) संख्येत भर पडत चालली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना एक पत्र लिहले आहे. याद्वारे त्यांनी तीन प्रमुख मुद्द्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. वयापेक्षा आवश्यकतेनुसार लसीकरण करावे, ज्या भागात संसर्ग वाढू लागला आहे, तिथे लस उपलब्ध करुन द्याव्यात आणि आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक त्या लसी वापरण्यास परवानगी द्यावी, असे गांधींनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. 

सोनिया गांधींनी सरकारकडे आणखी एक विनंती केली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने गरिबांना मासिक सहा हजार रुपयांची मदत देण्यात यावी. 

उधमसिंह यांनी जनरल डायरचीच हत्या केली होती का?​

कोरोनाची लस आवश्यकतेनुसार द्या
कॉंग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत शनिवारी सोनिया गांधींनी डिजीटल बैठक घेतली. या बैठकीचा संदर्भ देत त्यांनी पत्रात म्हटले आहे की, लस ही सध्याची सर्वात मोठी आशा आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट ही की, बहुतेक राज्यांमध्ये तीन ते पाच दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत लस बनवण्याची गती वाढवावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत इतर कंपन्यांच्या लसी वापरण्यास त्वरित मान्यता देण्याची गरज आहे. तसेच वयापेक्षा आवश्यकतेनुसार लस दिली गेली पाहिजे. राज्यांनाही संसर्ग स्थिती आणि पुढील अंदाज लक्षात घेत लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा.'

सीआरपीएफने आठ जणांना मारायला हवे होते; भाजप प्रदेशाध्यक्षाचं खळबळजनक वक्तव्य​

गरिबांना आर्थिक मदत द्या
कोरोना व्हायरसच्या संसर्गाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारी सर्व वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि संबंधित पायाभूत सुविधा यांना जीएसटीमधून सूट देण्यात यावी. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत, अशा परिस्थितीत गरीब आणि दुर्बल घटकांतील लोकांना सहा हजार रुपयांची मासिक आर्थिक मदत करावी, असे आवाहनही सोनिया गांधींनी पंतप्रधानांना केलं आहे.

दरम्यान, सोमवारी (ता.१२) देशभरात १ लाख ६८ हजार ९१२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ३५ लाखाच्या पुढे गेली आहे. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येत रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image