
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असताना प्रियकर हळूच प्रेयसीच्या घरी पोहचला. शेजारच्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्याला पकडून बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.
मेरठ (उत्तर प्रदेश): कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असताना प्रियकर हळूच प्रेयसीच्या घरी पोहचला. शेजारच्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्याला पकडून बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.
सामूहिक बलात्कारानंतर ती रांगत-रांगत रस्त्यावर आली...
सिघावली अहीरचे पोलिस अधिकारी शिवप्रकाश यांनी सांगितले की, एक प्रियकर आपल्या बहिणीला घेऊन हळूच प्रेयसीच्या घरी गेला. दोघांना पळून जावून विवाह करायचा होता. प्रेयसीने बॅग भरल्यानंतर त्याच्या बहिणीसोबत निघाली. त्यांच्या पाठोपाठ प्रियकर होता. पण, हे सर्वजण पळून जाण्याच्या तयारीत असतानाच शेजारील नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरवात केली. नागरिक एकत्र आले आणि त्याला बेदम मारहाण केली. युवतीला तिच्या घरच्यांच्या ताब्यात दिले. याबाबतची माहिती पोलिसांना समजल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. युवकावर लॉकडाऊन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.