esakal | दोघांना हॉटेलमध्ये जाताना पाहिले अन्...

बोलून बातमी शोधा

lover couple entered hotel and people created rampage also clashed with police at haryana

अंबाला शहरातील लालकृती क्षेत्रातील परिसरामधील एका हॉटेलमध्ये दोघांना जाताना पाहिल्यानंतर एकच अफवा पसरली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तपासणी केली पण आक्षेपार्ह काही आढळले नाही. पण नागरिक ऐकायला तयार नव्हते.

दोघांना हॉटेलमध्ये जाताना पाहिले अन्...
sakal_logo
By
वृत्तसंस्था

अंबाला (हरियाणा): शहरातील लालकृती क्षेत्रातील परिसरामधील एका हॉटेलमध्ये दोघांना जाताना पाहिल्यानंतर एकच अफवा पसरली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तपासणी केली पण आक्षेपार्ह काही आढळले नाही. पण नागरिक ऐकायला तयार नव्हते.

Video:नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली बायको...

एका हॉटेलमध्ये एक युवक आणि महिला गेल्याची काही नागरिकांनी पाहिले आणि त्यांनी पोलिसांना कळवले. काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हॉटेलची तपासणी केली. दोघांकडे पुराव्यांची मागणी केली. त्यावेळी दोघांनी आपली ओळखपत्र दाखवली. पण, नागरिकांचे समाधान होत नव्हते. त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केली. सीसीटीव्हीमध्येही काही आक्षेपार्ह आढळून आले नाही. पोलिसांनी नागिरकांना समजावून सांगितल्यानंतर त्यांचे समाधान झाले.

'लॉकडाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवाल?'

पोलिसांनी सांगितले की, 'हॉटेलमध्ये आलेला युवक अविवाहीत तर महिला विवाहीत आहे. पण, तिच्या घटस्फोटाची याचिका दाखल आहे. दोघे जण गेल्या वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात आहेत. दोघांनी रितसर हॉटेलच्या रजिस्टरमध्ये नोंद केली होती. त्यामुळे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.'

देशात लॉकडाउन अन् जोडप्याचे मोटारीत नको ते उद्योग...