सामूहिक बलात्कारानंतर ती रांगत-रांगत रस्त्यावर आली...

वृत्तसंस्था
Friday, 27 March 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असताना दहा जणांच्या टोळक्याने एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारादरम्यान बेशुद्ध पडल्यानंतर शुद्ध आल्यावर ती रांगत रस्त्यावर आली आणि नागरिकांनी पाहिले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांना आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांची (झारखंड): कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असताना दहा जणांच्या टोळक्याने एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारादरम्यान बेशुद्ध पडल्यानंतर शुद्ध आल्यावर ती रांगत रस्त्यावर आली आणि नागरिकांनी पाहिले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांना आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video:नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली बायको...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लॉकडाऊनमुळे घरी परतणाऱ्या एका 16 वर्षीय विद्यार्थीनीवर 10 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दुमका येथे मंगळवारी (ता. 24) घडली. पीडीत युवती प्रखंड परिसरातील आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये पीडित युवतीने सांगितले की, दुमका शहरातील शिवपहार येथे भाड्याच्या घरात राहून, शिक्षण घेत आहे. लॉकडाऊन झाल्याने महाविद्यालय बंद होते. शिवाय, वाहनेही बंद होती. एका मैत्रिणीसह ती घरी परतली. गावाच्या सीमेवर मैत्रिण तिला सोडून पुढे गेली. गावाजवळ आल्यानंतर घरातील सदस्यांना बोलावले होते. पण, एक मित्र विक्की उर्फ प्रसन्नजित हंसदा हा मित्रासह दुचाकीवरून आला. तिघेही दुचाकीवरून निघालो असताना विकीने घरी जाण्याऐवजी दुसऱ्या वाटेवरुन दुचाकी घेतली. त्याने आपण दुसऱया रस्त्याने जाऊ म्हणून सांगितले. काही अंतर गेल्यानंतर विकीने निर्जन जंगलाजवळ दुचाकी थांबविली आणि शौचालयाला जातो म्हणून सांगितले. यावेळी त्याच्या अज्ञात मित्रासह बराच काळ जंगलात उभी होते. त्यानंतर विक्कीने तिच्या मित्रासह तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर आठ तरुण तोंडाला कपडा बांधून आले आणि जिवे मारण्याची धमकी देत गळ्यावर चाकू धरला. यानंतर सर्वांनी सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्काराच्या वेळी बेशुद्ध पडले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी जंगलातून रांगत रस्त्यावर आले. यावेळी गावकऱ्यांनी पाहिले आणि कुटुंबीयांना माहिती दिली. यानंतर आई, वडील आणि भाऊ आले आणि तिला उचलून घरी घेऊन गेले. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. शिवाय, उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले.

दोघांना हॉटेलमध्ये जाताना पाहिले अन्...

पोलिस अधिकारी वाय. एस. रमेश म्हणाले की, विद्यार्थीनीसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे. पीडित युवतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'लॉकडाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवाल?'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lockdown 10 boys gangraped girl in jharkhand