कोरोनाचा कहर! गृह मंत्रालयाने राज्यासाठी जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

home ministry
home ministry

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने राज्यांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यांना केंद्राने चाचण्यांची गती वाढवण्यास सांगितलं आहे. जे लोक कोरोनाने संक्रमित होतील, त्यांना तत्काळ विलगीकरणात ठेवण्यात यावे. तसेच लवकरात लवकर उपचाराची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितलं आहे. चाचण्या, संसर्गाची साखळी तोडने, उपचार प्रोटोकॉलचे कठोरपणे पालन करण्यास सांगण्यात आलंय. ज्या ठिकाणी कोरोनाची प्रकरणे जास्त आढळून येतील, त्याठिकाणी कंटेंमेंट झोनची घोषणा करण्यास सांगितलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय की, 'कंटेन्मेंट झोन क्षेत्रांना वेबसाईटवर अपलोड करावे, जेणेकरुन लोकांना याची माहिती मिळेल. तसेच याला आरोग्य विभागासोबतही शेअर करा. जो क्षेत्र कंटेन्मेंट म्हणून घोषित होईल त्यावर लक्ष ठेवण्यात यावे.'

सार्वजनिक जागा, कार्यालये, बाजार, गर्दीच ठिकाणे अशा ठिकाणांवर कोरोना नियमांचे कठोरपणे पालन व्हावे याची जबाबदारी राज्य आणि जिल्हा प्रशासनाची असेल. गृह मंत्रालयाने राज्यांना सांगितलं की, लोकांनी मास्क लावावा, शारीरिक अंतराचे पालन करावे यासाठी सक्ती करावी. तसेच त्यांच्याकडून दंड वसूल करावा. कोरोनाची प्रकरणं जास्त आढळल्यास स्थानिक स्तरावर शहर, वार्ड आणि पंचायतला लॉकडाऊन करण्यात यावे. दुसरीकडे, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेशास बंदी नसेल. विशेष करुन एका राज्यातून दुसऱ्या राज्यांत जात-येत असलेल्या व्यावसायिंकाना यातून सूट असावी. 

भारतामध्ये कोरोना महामारीची प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. दरदविशी कोरोना रुग्णांच्या संख्या नवा विक्रम प्रस्थापीत करत आहे. आरोग्य मंत्रायलानं मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनं थोडाफार दिलासा दिला. मात्र, सहा राज्यातील कोरोना रुग्णांची होणारी वाढ देशाची चिंता वाढवणारी आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू यासारख्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातसह सहा राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देशातील एकूण नव्या रुग्णांपैकी ८४ टक्के इतकी आहे.  या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे लोकांच्या चिंतेत भर पडत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com