दिल्लीला कसं जमतंय! कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ८७.२९% 

Corona_Test_Lab1.jpg
Corona_Test_Lab1.jpg
Updated on

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात ५० हजारांच्या जवळ कोरोनो रुग्ण सापडले आहेत. मात्र, दिल्लीमधील परिस्थिती सुधारताना दिसत आहे. दिल्लीतील रुग्णांचा बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) तब्बल ८७.२९ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे दिल्लीत सध्या केवळ ९.७७ टक्के सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. 

एक दोन नव्हे, तर तब्बल २२ भाषा बोलते 'ही' मराठी तरुणी!
दिल्लीत गेल्या २४ तासात ११४२ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतचा एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १,२९,५३१ झाला आहे. तसेच गेल्या २४ तासात २१३७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १,१३,०८६ कोरोनाग्रस्त रुग्ण घरी परतले आहेत. गेल्या २४ तासात २९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ३८०६ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिल्लीने मागील २४ तासात २०,५०९ लोकांच्या चाचण्या घेतल्या आहेत. दिल्लीत आतापर्यंत ९,२९,२४४ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सध्या दिल्लीत १२,६५७ सक्रिय प्रकरणे आहेत.

गेल्या काही दिवसापासून देशात जवळपास ५० हजारांच्या जवळ कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. शनिवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशात ४८,९१६ नवीन प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे देशात आता एकूण कोरोना बाधितांची संख्या १३,३६,६६१ झाली आहे. गेल्या २४ तासात ७५७ लोकांचा मृत्यू झालाने एकूण मृतांची संख्या वाढून ३१,३५८ झाली आहे. 

ढगफुटी सदृष्य अतिवृष्टी! हवेली परिसरात पिकासह रस्तेही गेले वाहून
समाधानाची बाब म्हणजे कोरोना महामारीतून बरे होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात आतापर्यंत ८,४९,४३२ लोकांनी कोरोना विषाणूवर यशस्वीपणे मात दिली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचा दर थोडासा सुधारुन आता ६३.५३ टक्के झाला आहे. पॉजिटिव्हिटी रेट वाढून ११.६२ टक्के झाला आहे. 

गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शिवाय केवळ दोन दिवसात जवळपास एक लाखांच्या जवळ कोरोनाबाधित सापडले आहेत. सुरुवातीला ११० दिवसात १ लाख रुग्ण सापडले होते. भारतात कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. जगात अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत. २४ जूलै रोजी भारतात ४ लाख २० हजार ८८८ कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत. आतापर्यंत देशात १,५८,४९,०६८ लोकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com