Corona Updates - देशात पुन्हा रुग्णवाढीचा कहर; आकडेवारी चिंता वाढवणारी

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 1 October 2020

देशातील कोरोनाची बाधा (COVID19) झालेल्यांचा आकडा 63 लाख 12 हजार 585 झाला आहे

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या 63 लाखांच्या वर गेली आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाने 1,181 रुग्णांचा मृत्यू झाला असून 86 हजार 821 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंंत कोरोनाने 98 हजार 678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 2 दिवसांत कोरोना रुग्णांची आकडेवारी 80 हजारांच्या खाली गेल्याने दिलासादायक स्थिती निर्माण झाली होती. पण मागील 24 तासांतील वाढ जवळपास 90 हजारांच्या जवळ गेल्याने चिंतेत वाढ झाली आहे. 

देशातील कोरोनाची बाधा (COVID19) झालेल्यांचा आकडा 63 लाख 12 हजार 585 झाला आहे. सध्या देशात 9 लाख 40 हजार 705 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत 52 लाख 73 हजार 202 जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे. 

अनलॉक 5: चित्रपटगृहे खुली होणार; केंद्र सरकारने जारी केली नियमावली

बुधवारी देशात अदल्या दिवशीपेक्षा 3 लाखांनी जास्त कोरोना चाचण्या झाल्या आहेत. देशात बुधवारी कोरोनाच्या 14 लाख 23 हजार 52 चाचण्या झाल्या आहेत. कालच्या चाचण्या धरून देशात आतापर्यंत 7 कोटी 56 लाख 19 हजार 781 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये जवान हुतात्मा; पाककडून सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन

कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यांनी चिंता वाढत असताना सरकारने आता अनलॉक 5 सुरु केले आहे. अनलॉक 5 मध्ये काढलेल्या निर्बंधामुळे देशात कोरोना रुग्णसंख्या वाढू शकते. यामध्ये राज्यांतर्गत रेल्वेसेवा, बार, उपाहारगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients in india cross 63 lakh