esakal | कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या नातेवाइकांना समान भरपाईची मागणी करणारी याचिका फेटाळली
sakal

बोलून बातमी शोधा

Supreme-Court

कोरोना संसर्गामुळे मरण पावलेल्यांच्या नातेवाइकांना समान नुकसान भरपाई देण्यासाठी वेगळे राष्ट्रीय धोरण अमलात आणले जावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने इन्कार केला आहे.

कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या नातेवाइकांना समान भरपाईची मागणी करणारी याचिका फेटाळली

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - कोरोना संसर्गामुळे मरण पावलेल्यांच्या नातेवाइकांना समान नुकसान भरपाई देण्यासाठी वेगळे राष्ट्रीय धोरण अमलात आणले जावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने इन्कार केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

न्या. अशोक भूषण आणि न्या. आर.एस. रेड्डी यांच्या खंडपीठाने प्रत्येक राज्याचे वेगळे धोरण असून ते त्यांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे भरपाई देत असल्याचे सांगितले. देशभरात सर्वांना समान भरपाई मिळावी म्हणून एक वेगळे धोरणच आखले जावे अशी मागणी याचिकाकर्ते हाशीक थायीकांडी यांनी सादर केली होती. 

देशात कोरोनाबाधितांची संख्या 31 लाखांवर; सीरमच्या लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू 

दिल्लीमध्ये राज्य सरकार एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देते पण काही राज्ये एक लाखांची भरपाई देत आहेत, यामुळे समान भरपाईसाठी वेगळे धोरण आखले जावे असे या याचिकेमध्ये नमूद करण्यात आले होते. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनीच ऐनवेळी माघार घेण्याची मागणी केली असल्याने आम्ही ही याचिका फेटाळून लावत आहोत असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top