संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील निर्बंधांत वाढ

उत्तर प्रदेश, हरियानामध्ये रात्रीची संचारबंदी; नाताळ, नववर्षाच्या स्वागतावर निर्बंध
Corona Restrictions
Corona RestrictionsSakal

Delhi : कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या व्हेरिएंटच्या (Corona Omicron Variant) संसर्गाचा धोका वाढत असल्याने विविध राज्यांनी युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखायला सुरूवात केली आहे. उत्तर प्रदेशात उद्या (ता.२५) पासून रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी असेल.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातनेही अशाच प्रकारच्या उपाययोजना आखल्या आहेत. हरियानामध्ये नव्या वर्षात रात्री अकरा ते पहाटे पाचवाजेपर्यंत संचारबंदी असेल. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन निर्बंध लागू केले जात आहेत. दिल्ली, कर्नाटक आणि ओडिशा या राज्यांनी नववर्षाच्या कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. गुजरातच्या आठ शहरांमध्ये निर्बंध कठोर करण्यात आले आहेत.

Corona Restrictions
उत्तराखंडमध्ये भाजपला डबल दणका; मंत्र्यासह आमदाराचा राजीनामा?

‘यूपी’चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर उपरोक्त निर्देश देण्यात आले. लग्नसमारंभासारख्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये केवळ दोनशे लोकांनाच उपस्थित राहता येणार असून येथे कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल. मोठे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यापूर्वी त्याची स्थानिक अधिकाऱ्यांना पूर्वसूचना देणे आवश्यक असेल. ‘मास्क नसेल तर वस्तूही नाही’ अशा प्रकारचे कठोर धोरण व्यापाऱ्यांनी राबवावे असे आवाहन मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केले आहे. स्थानिक पातळीवर नियमांचे पालन होते आहे की नाही यावर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवावे असे निर्देशही देण्यात आले आहेत.

तिरुपती दर्शनासाठी कोविड चाचणी आवश्यक

तिरुमला, (आंध्र प्रदेश) : तिरुपती देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्यांचा ‘कोविड- १९’ चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे किंवा लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्‍यक केले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान‌तर्फे (टीटीडी) याबाबतचे निवेदन दिले आहे. अटींची पूर्तता न करणाऱ्यांना परत पाठविले जात असल्याचेही देवस्थानने म्हटले आहे.

Corona Restrictions
सीडीएस परीक्षेत बुलढाण्याच्या अपूर्वचे अभूतपूर्व यश

बूस्टर डोसची सरकारकडून चाचपणी

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने बूस्टर डोसची आवश्यकता पडताळून पाहायला सुरूवात केली आहे. ‘ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट’मधील जैवशास्त्रविभागाकडून याबाबतच्या संशोधनाला सुरूवात करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये दोन्ही डोस देण्यात आलेल्या तीन हजार लोकांना सामावून घेण्यात आले असून त्यांना तिसरा डोस देऊन याबाबतची परिणामकारकता पडताळून पाहण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com