esakal | स्पर्श न करताच Covid टेस्ट; खोकल्याच्या आवाजावरुन App देणार रिपोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

cough

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे सर्व जग हैराण झालं आहे. अजूनही कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. अमेरिकेनंतर भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे.

स्पर्श न करताच Covid टेस्ट; खोकल्याच्या आवाजावरुन App देणार रिपोर्ट

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे सर्व जग हैराण झालं आहे. अजूनही कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. अमेरिकेनंतर भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. भारतात आतापर्यंत 1 कोटी 14 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर आतापर्यंत 1 लाख 58 हजार लोकांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. असे असताना देशात लसीकरण सुरु झाले आहे. लसीकरण मोहिमेने गती घेतली आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत असताना मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या घेण्यात येत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त कोरोना चाचण्या घेणे आवश्यक आहे. कोरोना सदृश्य लक्षणं दिसून आल्यास तत्काळ कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येतो. अशात एक चांगली बातमी समजत आहे. वैज्ञानिकांनी खोकल्याच्या आवाजावरुन कोरोनाचा पता लागण्यासाठी एका उपकरणाचा शोध लावला आहे. यासाठी एक ऍप देखील विकसित केले जात आहे. 

स्पेन आणि मॅक्सिकोमध्ये एप्रिल महिन्यामध्ये या उपकरणाने जवळपास 8 हजार सॅम्पल घेण्यात आले होते. यातील जवळपास 2 हजार लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि सहा हजार लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. वैज्ञानिकांनी दावा केलाय की हे उपकरण 98 टक्के प्रभावी सिद्ध झाले आहे. या उपकरणामुळे केवळ खोकल्याच्या आवाजाने कोरोनाचा तपास होऊ शकणार आहे. हे सगळ्यात लवकर रिझल्ट देणारे सर्वात स्वस्त उपकरण आहे. विशेष म्हणजे शरीराला स्पर्श न करताच याचा तपास होऊ शकणार आहे. 

गेल्यावर्षी हेल्थ सेक्टरवर सर्वांत जास्त सायबर हल्ले; जगभरात दर 10 सेकंदाला एक...

सध्या कोरोनाची दोन पद्धतीने चाचणी घेतली जात आहे. यात पहिले आरटी-पीसीआर आणि दुसरा अॅटीजन टेस्ट आहे. या दोन्ही पद्धतीने लोकांच्या नाकातून सॅम्पल घेतला जातो. नव्या उपकरणामुळे या थोड्याशा त्रासदायक समस्येतून सुटका होऊ शकणार आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ एसेक्सचे वैज्ञानिक डॉ. जेवियर आंद्रेयू पेरेस यांनी म्हटलं की, या उपकरणाचे परिणाम पाहून मी खूष आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा गेम चेंजर सिद्ध होऊ शकतो. 

कसा होतो ब्लड कॅन्सर? जाणून घ्या लक्षण व उपचारांविषयी

भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 23,285 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,13,08,846 वर जाऊन पोहोचली आहे. भारतात काल 15,157 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,09,53,303 वर पोहोचली आहे. काल देशात 117 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना मृतांची संख्या ही 1,58,306 वर पोहोचली आहे. सध्या देशात 1,97,237 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. भारतात आतापर्यंत 2,61,64,920 लोकांना लस देण्यात आली आहे.

loading image
go to top