esakal | Corona सक्रीय रुग्णांमध्ये बंगळूर अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानावर

बोलून बातमी शोधा

Corona Patients
Corona सक्रीय रुग्णांमध्ये बंगळूर अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानावर
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

बंगळूर - बंगळूर शहर कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट म्हणून समोर आले आहे. पुणे, मुंबई, दिल्ली या शहरांना मागे टाकून कोरोना सक्रिय प्रकरणांत बंगळूर शहर आता देशात पहिल्या स्थानावर आले आहे. आयटी सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळूर शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. शुक्रवारी बंगळूर शहरामध्ये १६ हजार ६६१ नवीन प्रकरणे आढळून आली. यासह शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ४९ हजार ६२४ झाली आहे.

बंगळूरनंतर पुणे शहर सक्रिय प्रकरणांमध्ये दुसऱ्या स्थानावर असून तेथील सक्रिय रुग्णांची संख्या १.१ लाख इतकी आहे. बंगळूर, पुणे वगळता देशातील इतर जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी आहे. मुंबईमध्ये ८१ हजार १७४ सक्रिय प्रकरणे आहेत. राज्यातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी सत्तर टक्के प्रकरणे बंगळूर शहरात आढळून येत आहेत. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास मे महिन्यात रोज पंचवीस हजारपर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यापैकी पाच टक्के लोकांना जरी तातडीची सेवा पुरविण्याची परिस्थिती निर्माण झाली तरी परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे, असा इशारा तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. गिरिधर बाबू यांनी दिला.

हेही वाचा: राज्यांना लस मोफतच देणार; किंमतीवरून केंद्राचं स्पष्टीकरण

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाउन, नाईट कर्फ्यू जारी केला आहे. यासाठी लोकांनी सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या लाटेत संसर्ग तीव्र गतीने पसरतो आहे. लोकांना घरीच राहावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात राज्यात १९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.