esakal | राज्यांना लस मोफतच देणार; किंमतीवरून केंद्राचं स्पष्टीकरण

बोलून बातमी शोधा

कोरोना लस

राज्यासाठी लशीची किंमत वेगळी आणि केंद्रासाठी वेगळी असल्यानं हा दुजाभाव कशासाठी असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.

राज्यांना लस मोफतच देणार; किंमतीवरून केंद्राचं स्पष्टीकरण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून लसीकरण मोहिम आता एक मे पासून व्यापक करण्यात येत आहे. एक मे पासून देशात 10 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार आहे. दरम्यान, देशात लशीच्या किंमतीवरून राजकारण तापलं आहे. राज्यासाठी लशीची किंमत वेगळी आणि केंद्रासाठी वेगळी असल्यानं हा दुजाभाव कशासाठी असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. त्यातच आता सीरम इन्स्टिट्यूटने स्पष्टीकरण दिलं असून केंद्रानेही लशीच्या किंमतीबाबत स्पष्ट केलं आहे. आऱोग्य मंत्रालयाने म्हटलं की, सर्व राज्यांनी लस मोफतच दिली जाईल. दोन्ही लशी एकाच किंमतीला खरेदी करण्यात येतील असंही सांगण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, दोन्ही लशींची खरेदी भारत सरकार 150 रुपये प्रति डोस करत आहे. भारत सरकारने खरेदी केलेली लस राज्यांना मोफत देण्यात येईल असंही केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. एक मेपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.

हेही वाचा: "कोविशिल्डची किंमत माफकच"; लस महाग असल्याच्या चर्चांवर 'सीरम'चं स्पष्टीकरण

लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने स्पष्टीकरण दिलं आहे. यामध्ये सरकारच्या लसीकरण मोहिमेसाठी ही लस माफक दरात उपलब्ध करुन देण्यात आली असून, फक्त मोजक्या खासगी वितरणासाठी ती ६०० रूपयांना विकली जाणार आहे, असं सीरमनं म्हटलं आहे. कोव्हिशिल्डच्या एकूण उत्पादनापैकी अगदी थोडा साठ खासगी खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच, बाजारात सध्या उपलब्ध कोरोना उपचार पद्धती आणि औषधांच्या तुलनेत ही लस स्वस्त असल्याचे पुनावाला यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: 'रिकामी घरे, बंगले, हॉल, गाळे कोरोना रुग्णांसाठी द्या'; भरत जाधवचं आवाहन

भारतात आतापर्यंत 13 कोटी 83 लाखांहून अधिक लशीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात देशात 29 लाखांपेक्षा जास्त जणांना लस टोचण्यात आली. तर 2 लाख 19 हजार जण कोरोनामुक्त झाले. देशातील कोरोनामृत्यूचे प्रमाण कमी झाले असून ते 1.14 टक्के इतके खाली आले आहे. गेल्या 24 तासात देशातील 11 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.