देशात कोरोना संसर्ग कमी होतोय; दिवसभरात 3.29 लाख नवे रुग्ण

कोरोना टेस्ट
कोरोना टेस्टTeam Esakal
Updated on

नवी दिल्ली - देशात कोरोना संसर्गाचा (Covid 19) वेग कमी होत असून मृत्यूची संख्याही कमी होत आहे. सोमवारी दिवसभरात 3 लाख 29 हजार 942 नवीन रुग्ण सापडले. तर 3 लाख 56 हजार 82 जण कोरोनामुक्त झाले. गेल्या 24 तासात 3 हजार 876 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. याआधी रविवारी देशात तीन लाख 66 हजार 161 नवीन रुग्ण आढळले होते. तर गेल्या आठवड्यात बुधवार ते शनिवार लागोपाठ चार दिवस दररोज 4 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत सोमवारी रुग्णसंख्या सव्वा तीन लाखांवर खाली आली आहे. (corona update india 11 may 2021 new cases more than 3 lakh)

आतापर्यंत देशात 2 कोटी 26 लाख 92 हजार 575 जणांना कोरोनाची लागण झाली असून 1 कोटी 90 लाख 27 हजार 304 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील मृतांची संख्या 2 लाख 49 हजार 992 इतकी झाली असून सध्या 37 लाख 15 हजार 221 जण उपचार घेत आहेत. डिस्चार्ज झालेल्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र(Maharashtra), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), गुजरात(Gujrat), कर्नाटक(Karnataka), तामिळनाडु, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि दिल्लीतील 74 टक्के रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना टेस्ट
देशभरात तीन दिवसांत नऊ लाख लशी देणार

भारतात आतापर्यंत 30 कोटी 56 लाख 187 जणांची कोरोना चाचणी झाली आहे. यात सोमवारी दिवसभरात 18 लाख 50 हजार 110 जणांची कोरोना चाचणी झाल्याचं आय़सीएमआरने म्हटलं आहे.

कोरोना टेस्ट
Srinivas BV : कोरोना संकटात ठरतोय देवदूत, परदेशातही चर्चा

लसीकरण मोहिम

कोरोना विरोधातील लढ्यात लसीकरण मोहिमेला देशात सुरवात झाली आहे. आतापर्यंत 17 कोटी 26 लाख डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार 18 ते 44 वयोगटातील 5 लाख 18 हजार 479 जणांना सोमवारी पहिल्या लशीचा डोस देण्यात आला. यामुळे देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु झाल्यानंतर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लस घेणाऱ्यांची या गटातील संख्या ही 25 लाख 52 हजार 843 इतकी झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात 5 लाख 10 हजार 347, राजस्थानमध्ये 4 लाख 11 हजार, दिल्लीत 3 लाख 66 हजार 309, गुजरातमध्ये 3 लाख 23 हजार 601 आणि हरयाणात 2 लाख 93 हजार 716, बिहारमध्ये 1 लाख 77 हजार 885, उत्तर प्रदेशात 1 लाख 66 हजार 814 आणि आसाममध्ये 1 लाख 06 हजार 538 जणांनी लस घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com