Corona Update : गेल्या 24 तासांत 717 जणांचा मृत्यू; सध्या 7,15,812 ऍक्टीव्ह रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

सोमवारी देशात 50 हजाराहून कमी रूग्ण सापडले होते.

नवी दिल्ली : मंगळवारी भारतात 54,044 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह आतापर्यंत भारतात 7.6 दशलक्ष लोकांना या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या 24 तासांत 717 मृत्यू या रोगाच्या प्रादुर्भावाने झाले असून आतापर्यंत देशात 116616 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आजवर सापडलेल्या 76,51,108 रुग्णांपैकी सध्या 7,15,812 इतके रुग्ण ऍक्टीव्ह आहेत तर आतापर्यंत 68,74,518 रुग्ण या रोगाशी दोन हात करण्यात यशस्वी ठरले आहेत. आतापर्यंत 9,86,70,363 टेस्ट भारतात झाल्या आहेत. काल 14,69,984 टेस्ट भारतात करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - ब्राझीलमध्ये ऑक्सफर्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान व्हॉलेंटिअरचा मृत्यू

सोमवारी देशात 50 हजाराहून कमी रूग्ण सापडले होते. गेल्या तीन महिन्यांमध्ये पहिल्यांदाच इतक्या कमी प्रमाणावर रुग्ण देशात सापडले होते. देशातील कोरोनाचे आकडे घटत आहेत. जगात सर्वांत जास्त रुग्ण भारतात सापडत होते. मात्र आता तब्बल अडीच महिन्यांनंतर ही परिस्थिती बददली आहे. गेल्या तीन दिवसांत भारतापेक्षा अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. तसेच युरोपात अनेक देशांत रुग्णांची संख्या वाढली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या वर्षांत कोरोनावर प्रभावी ठरतील अशा अनेक लशी जगभरात उपलब्ध होतील. मात्र, युरोपातील अनेक देशांत कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा धोका वाढला आहे. आरोग्य संघटनेच्या संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी बुधवारी म्हटलं की, ज्या देशांत मुलभूत आरोग्य व्यवस्था सुस्थितीत आहे त्या देशांत गेल्या आठ महिन्यांत परिस्थिती हातात ठेवण्यात यश आलेलं आहे. मात्र ज्या देशांत ही व्यवस्था मजबूत नाहीये तिथे आधी मुलभूत आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे, हेच या महामारीने दाखवून दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona update india 22 october corona report update