
नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,624 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह आजवरच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,00,31,233 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 29,690 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 95,80,402 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 341 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवरच्या एकूण कोरोना मृतांची संख्या 1,45,477 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 3,05,344 ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या आहे.
गेल्या 24 तासांत 11,07,681 कोरोनाच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह आजवरच्या एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 16,11,98,195 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिली आहे.
साधारण गेल्या एका वर्षापासून संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. जगभरात परिणामकारक लशीसाठी स्पर्धा सुरु आहे. यातील काही लशींच्या चाचण्या घेतल्यानंतर मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये फायझर-बायोनटेक या लशीला अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलने मान्यता दिली आहे. आपत्कालीन वापरासाठी या लशींचा वापर करण्यात येत आहे. कालच इस्रायलचे पंतप्रधान बेजांमिन नेतन्याहू यांना लस देऊन इस्रायलमध्ये लशीकरणास सुरवात करण्यात आली आहे. भारतात लवकरच लशीकरण सुरु करण्यात येईल, अशी चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.