Corona Update : देशात आतापर्यंत 8,06,484 लोकांचे लसीकरण; राज्यात 4,589 रुग्णांना डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

सध्या राज्यात 46,769 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे नवे 15,223 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,06,10,883 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 19,965 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,02,65,706 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत. 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,52,869 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 1,92,308 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. तर देशात आतापर्यंत 8,06,484 लोकांचे लसीकरण पार पडले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

गेल्या 24 तासांत देशात 7,80,835 चाचण्या केल्या गेल्या. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 18,93,47,782 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती ही Indian Council of Medical Research ने दिली आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात 3,015 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 19,97,992 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 4,589 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही18,99,428 वर पोहोचली आहे. राज्यात काल 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 50,582 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 46,769 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India marathi report 21 january 2021