esakal | Corona: रुग्णसंख्या वाढली; राज्यात रुग्णवाढीसाठी लग्नसराई आणि निष्काळजीपणा कारणीभूत

बोलून बातमी शोधा

corona update india}

नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,12,29,398 वर पोहोचली आहे.

Corona: रुग्णसंख्या वाढली; राज्यात रुग्णवाढीसाठी लग्नसराई आणि निष्काळजीपणा कारणीभूत
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत 18,599 रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,12,29,398 वर पोहोचली आहे. भारतात काल 14,278 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,08,82,798 वर पोहोचली आहे. काल देशात 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,57,853 वर पोहोचली आहे. सध्या देशातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 1,88,747 वर पोहोचली आहे. 

महाराष्ट्रात केंद्राचं पथक वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहणीसाठी आलं होतं. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर कोरोना संपला आहे, असं समजून लोकांचा वाढता निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुका, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ ही कारणे कारणीभूत आहेत. तसेच लोकलसह इतर सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु करणे अशा काही गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचं निरिक्षण केंद्रीय पथकाने नोंदवलं आहे. लोकलमधील गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव होत असल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात प्रामुख्याने म्हटलं आहे. तसेच राज्यातील आरोग्य यंत्रणा देखील आता खुप गांभीर्याने काम करत नसल्याचं केंद्रीय पथकाने या अहवालात नमूद केलं आहे. 

हेही वाचा - राज्यातील कोरोनावाढीवर केंद्राचा अहवाल; या कारणांमुळे महाराष्ट्रात वाढला कोरोना

राज्यात काल 11,141 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तसेच काल नवीन 6,013 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 20,68,044 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 97,983 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.17% झाले आहे.