दिलासा! नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्या जास्त


Corona Patient Update in India
Corona Patient Update in India sakal
Summary

भारतात काल दिवसभरात ३ लाख ६ हजार ३५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

नवी दिल्ली - देशातील कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं बघायला मिळालं. गेल्या २४ तासात जवळपास ३ लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात २ लाख ८६ हजार ३८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत आज नव्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली आहे. बुधवारी लाख ८५ हजार ९१४ नवे रुग्ण सापडले होते. देशात (India) आतापर्यंत एकूण रुग्ण ४ कोटींहून जास्त आढळले आहेत. (Corona Patient Update in India)

गेल्या २४ तासात भारतात ५७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ४ लाख ९१ हजार ७०० जणांना कोरोनामुळे प्राण गमावावे लागले आहेत. दुसरीकडे सध्या भारतातील सक्रीय रुग्णांची संख्या २२ लाखांच्या वर पोहोचली आहे. मात्र गेल्या २४ तासात सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. भारतात काल दिवसभरात ३ लाख ६ हजार ३५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर आतापर्यंत एकूण ३ कोटी ७६ लाख ७७ हजार ३२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.


Corona Patient Update in India
ओमिक्रॉनच नव्हे इतर सर्व व्हेरियंटवर अँटीबॉडीज प्रभावी - ICMR

सध्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा १९.५९ टक्के इतका आहे. तर आठवड्याचा संसर्ग दर हा १७.७५ टक्के इतका आहे. देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरु असून आतापर्यंत १६३.८४ कोटी डोस देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत ७२.२१ कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यात गेल्या २४ तासात १४ लाख ६२ हजार २६१ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com