ओमिक्रॉनच नव्हे इतर सर्व व्हेरियंटवर अँटीबॉडीज प्रभावी - ICMR

ओमिक्रॉनमुळे जगासह भारतात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
sero
serosero

नवी दिल्ली : ओमिक्रॉनमुळे (Omicron) शरिरात विकसित झालेल्या अँटीबॉडी (Covid 19 Antibody ) केवळ ओमिक्रॉनविरोधातच नव्हे तर, कोरोनाच्या इतर सर्व (Covid 19 Variant) व्हेरिएंटविरोधात देखील प्रभावी ठरतील, असा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने केलेल्या अभ्यासातून करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ओमिक्रॉनमुळे जगभरात मोठ्या संख्येने कोरोनाची (Corona) लागण होणाऱ्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आयसीएमआरने केलेल्या या विधानामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. (ICMR Study On Omicron Antibody)

sero
Omicron: तुमचं मुलं कोरोना पॉझिटिव्ह झाले तर काय करावे?

ओमिक्रॉनमुळे संक्रमित (Omicron) व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक (Antibody) शक्ती चांगली दिसून आली असून, यामुळे केवळ या व्हेरिएंटचा (Omicron Variant) प्रतिबंध करण्यात मदत झाली असे नाही तर, डेल्टासह (Delta) कोरोना विषाणूच्या इतर प्रकारांविरूद्ध देखील ते प्रभावी होते, असे अभ्यासातून समोर आल्याचे ICMR म्हटले आहे. ICMR ने ओमिक्रॉन व्हेरिएंटशी संबंधित विशेष लस तयार करण्यावर भर दिला आहे. तथापि, हा अभ्यास केवळ ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Covid 19 Vaccination) संक्रमित झालेल्या लोकांवर केला गेला असून, सध्या, या अभ्यासाचे पुनरावलोकन करणे बाकी असून, हे अध्ययन अद्याप प्रकाशित करण्यात आलेले नाही, असे आयसीएमआरकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com