Corona Update - दिल्ली, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा उद्रेक; देशात १३,१५४ कोरोनाचे नवे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron

गेल्या २४ तासात देशात १३ हजार १५४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ९६१ वर पोहोचली आहे

दिल्ली, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा उद्रेक; देशात १३,१५४ कोरोनाचे नवे रुग्ण

दिल्ली - कोरोनाचा (Corona) नवा व्हेरिअंट हा वेगाने पसरत असून कमी होणारी रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. भारतातील रुग्णसंख्येतही वाढ होत असून गेल्या २४ तासात देशात १३ हजार १५४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ओमिक्रॉनच्या (Omicron) रुग्णांची संख्या ९६१ वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक दिल्लीत २६३ तर महाराष्ट्रात २५२ रुग्ण सापडले आहे.

देशातील सक्रीय रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या तुलनेत कमी असली तरी ती आता वाढत चालली आहे. सध्या देशात ८२ हजार ४०२ सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात ३ कोटी ४२ लाख ५८ रहजार ७७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख ८० हजार ८६० जणांनी प्राण गमावले आहे.

हेही वाचा: Omicron Updates : महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा स्फोट; भारतात 947 रूग्ण

कोरोनावर प्रतिबंधक लसिकरण मोहीम देशात वेगाने सुरु आहे. आतापर्यंत १४३ कोटी ८३ लाख २२ हजार ७४२ जणांनी लसीचे डोस घेतले आहेत. काल दिवसभरात ६३ लाख ९१ हजार २८२ डोस देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Web Title: Corona Update Omicron Variant New Cases 13154 In One Day

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top