Corona Update : गेल्या 24 तासांत 20,036 नवे रुग्ण; महाराष्ट्रात 58 रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

जागतिक आरोग्य संघटनेने आज गुरुवारी फायझर-बायोनटेक (Pfizer-BioNTech) लशीच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली आहे.

नवी  दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने आज गुरुवारी फायझर-बायोनटेक (Pfizer-BioNTech) लशीच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे चीनमध्ये कोरोना  व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा प्रादुर्भाव झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे.

भारतात गेल्या 24 तासांत 20,036 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह भारतातील आजवरच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 1,02,86,710 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत भारतात 23,181 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशात 98,83,461 रुग्ण आजवर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 256 रुग्ण दगावले आहेत. या नव्या मृतांसह देशातील एकूण कोरोनाबाधित मृतांचा आकडा हा 1,48,994 वर जाऊन पोहोचला आहे. 

 
गेल्या 24 तासांत देशात 10,62,420 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 17,31,11,694 वर जाऊन पोहोचली आहे. 

हेही वाचा - Breaking : WHO कडून Pfizer-BioNTech लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी

महाराष्ट्र राज्यात काल एका दिवसात नवे 3,509 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 19,32,112 वर पोहोचली आहे. काल एका दिवसांत 3,612 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,28,546 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 52,902 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. काल राज्यात 58 रुग्णांचा मृत्यू झाला. या नवा मृतांसह राज्यातील एकूण मृतांची संख्या ही 49,521 वर जाऊन पोहोचली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update Report India 1 January 2021