esakal | Corona Update : अदर पुनावालांनी सांगितली, चांगली व्हॅक्सिन कोणती?
sakal

बोलून बातमी शोधा

adar poonawala

भारतात कोरोना लस निर्माण करण्याच्या कामात अदर पुनावाला यांची सिरम इन्स्टिट्यूट (Serum Institute of India) आघाडीवर आहे.

Corona Update : अदर पुनावालांनी सांगितली, चांगली व्हॅक्सिन कोणती?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- जगभरात कोरोना महामारीचे थैमान सुरु आहे. अनेक देशांमध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर प्रभावी ठरणारी लस (Corona Vaccine) किंवा उपचार शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अनेक कोरोना लशी अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून डिसेंबर किंवा 2021 च्या सुरुवातीला कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे. अशात सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला ( CEO adar poonawala) यांनी चांगल्या कोरोना लशीची व्याख्या सांगितली आहे. 

दर्जेदार पुस्तकांच्या यादीत 3 भारतीयांची पुस्तके; ‘न्यूयॉर्क टाइम्स’कडून यादी...

अदर पुनावाला यांनी ट्विट करुन कोरोना लशीने चार निकष पूर्ण करणे आवश्यक असल्याचं म्हटलंय. लस ही सुरक्षित असावी, लशीने विषाणूपासून दिर्घकाळासाठी सुरक्षा पुरवणे आवश्यक आहे, व्यवस्थापन करु शकणाऱ्या तापमाणात लस ट्रान्सपोर्ट आणि स्टोर करता आली पाहिजे आणि लस सर्व मानवजातीला परवडणारी असली पाहिजे, असं अदर पुनावाला म्हणाले आहेत. 

भारतात कोरोना लस निर्माण करण्याच्या कामात अदर पुनावाला यांची सिरम इन्स्टिट्यूट (Serum Institute of India) आघाडीवर आहे. अदर यांनी दावा केलाय की, लस लवकरच उपलब्ध होईल.  ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची (covaxine) कोविड-19 लस आरोग्य कर्मचारी आणि वयस्कर लोकांसाठी फेब्रुवारी 2021 पर्यंत आणि सर्वसामान्य लोकांसाठी एप्रिलपर्यंत उपलब्ध होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. अदर पुनावाला यांच्या म्हणण्यानुसार लशीची किंमत 1 हजार रुपयांपर्यंत असेल. तसेच सर्व भारतीयांपर्यंत लस पोहोचण्यासाठी 2024 उजाडेल, असंही ते म्हणाले आहेत. 

सिरम इन्स्टिट्यूटने ब्रिटनच्या ऑक्सफर्ड लशीची करार केला आहे. ऑक्सफर्डची लस परिणामकारण असल्याचे सांगण्यात येत आहे. लशीने वयस्कर लोकांवर चांगले परिणाम दाखवले आहेत. असे असले तरी लशीचा डोस किती काळापर्यंत प्रभावी असेल याबाबत काही सांगण्यात आलेले नाही. येत्या दोन-तीन आठवड्यात ब्रिटनमध्ये या लशीचे अंतिम परिणाम येणार आहेत. भारतातही अनेक ठिकाणी या लशीचे परिक्षण सुरु आहे. देशात तयार होणाऱ्या ऑक्सफर्ड लशीचे 10 कोटी डोस भारतीयांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचं आदर पुनावाला यांनी याआधी जाहीर केले होते. 


 

loading image