
भारतात तब्बल ५७९ दिवसांनी कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची सर्वात कमी संख्या नोंद झाली.
भारतात सक्रीय रुग्णसंख्येत घट पण ओमिक्रॉनचा धोका वाढतोय
कोरोनाच्या (Covid 10) नव्या रुग्णांची संख्या भारतात सध्या दरदिवशी दहा हजारांपेक्षा कमी नोंद होत आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात ७ हजार १८९ कोरोनाचे रुग्ण आढळले. तब्बल ५७९ दिवसांनी देशातील सक्रीय रुग्णांची सर्वात कमी संख्या नोंद झाली. सध्या देशात ७७ हजार ३२ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. गेल्या २४ तासात देशात ७ हजार २८६ रुग्ण सापडले, आतापर्यंत एकूण ३ कोटी ४२ लाख २३ हजार २६३ जणांनी कोरोनावर मात केली.
देशातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसंच संसर्ग कमी होत असल्यानं सक्रीय रुग्णांच्या संख्येतही घट होत आहे. सक्रीय रुग्णांची संख्या ही एकूण कोरोनाबाधितांच्या एक टक्क्यापेक्षा कमी ०.२२ टक्के इतकी आहे. मार्च २०२० नंतर सर्वात कमी सक्रीय रुग्ण आहेत. सध्या देशात रिकव्हरी रेट वाढत आहे. देशात कोरोनातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण हे ९८.४० टक्के इतकं आहे.
हेही वाचा: महाराष्ट्रासह अनेक राज्यात नाइट कर्फ्यू; वाचा कुठे काय निर्बंध
देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेटही ८२ दिवसांपासून २ टक्क्यांपेक्षा कमी आहे. सध्या देशात ०.६५ टक्के पॉझिटिव्हीटी रेट आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ०.६० टक्के असून ४१ दिवसांपासून १ टक्क्यापेक्षा कमी आहे.
हेही वाचा: ओमिक्रॉनचा वेग चिंता वाढवणारा; महिन्याभरात १०८ देशात दीड लाख रुग्ण
देशात आतापर्यंत कोरोनामुळे ४ लाख ७९ हजार ५२० जणांनी प्राण गमावले आहेत. यातच आता ओमिक्रॉनचं संकट ओढावलं असून देशात आतापर्यंत ४१५ नव्या व्हेरिअंटचे रुग्ण आढलले आहेत. कोरोनाविरोधात प्रतिबंधक लसीकऱण मोहिमही वेगाने सुरु आहे. आतापर्यंत १४१ कोटींहून अधिक लशीचे डोस देण्यात आले आहेत.
भारतातील ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा संसर्ग होणाऱ्या रूग्णांची आकडेवारीत सातत्याने वाढ असून यामध्ये महाराष्ट्र - १०८, लडाख - ०१, जम्मू-काश्मीर - ०३, राजस्थान - २२, गुजरात - ४३, कर्नाटक - ३१, केरळ - ३७, तामिळनाडू - ३४, आंध्र प्रदेश - ०४, तेलंगणा - ३८, ओडिशा - ०४, पश्चिम बंगाल - ०३, उत्तर प्रदेश - ०२, दिल्ली - ७९, हरियाणा - ०४, चंदीगड - ०१, उत्तराखंडमध्ये ०१ रूग्णाची नोंद झाली आहे. यापैकी ११५ जण बरे होऊन घरी परतले आहेत.
Web Title: Corona Update Today Omicron In India New Guidelines Night Curfew
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..