कोरोनाचा तडाखा; 24 तासांत तब्बल 1.45 लाखांहून अधिक रुग्ण, 794 जणांचा मृत्यू

Corona_Test_Lab1.jpg
Corona_Test_Lab1.jpg

नवी दिल्ली- कोरोना रुग्णांची वाढती संख्या सर्वांच्याच चिंतेचा विषय ठरला आहे. शनिवारी कोरोना रुग्णाची विक्रमी नोंदणी झाली आहे. मागील 24 तासांत तब्बल 1.45 लाखांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील 24 तासांत आतापर्यंत सर्वाधिक 1 लाख 45 हजार 384 नवीन प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या वाढून 1,32,05,926 इतकी झाली आहे. तर मागील 24 तासांत 794 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण मृतांचा आकडा हा 1,68,436 झाला आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त गेली आहे. मागील पाच दिवसांत 6 लाख 16 हजार 859 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर 3335 जणांचा मृत्यू झाला आहे. 

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखांपेक्षा जास्त आहे. आरोग्य मंत्रालयानुसार 10,46,631 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्हणजेच एकतर हे रुग्ण डॉक्टरांच्या सूचनेनुसार होम आयसोलेशनमध्ये आहेत किंवा त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णांची 10 लाखांची आकडेवारी अवघ्या 57 दिवसांत पार केली आहे. तर पहिल्या लाटेत 10 लाखांचा आकडा गाठण्यासाठी 98 दिवस लागले होते. दुसरीकडे लसीकरण मोहीमही तीव्र करण्यात आली आहे. मागील 24 तासांत देशात 3,415055 जणांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे एकूण लाभार्थ्यांची संख्या 9,8075160 इतकी झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com