esakal | corona updates: दिलासादायक! मागील 24 तासांत कोरोना रुग्णवाढीत घट
sakal

बोलून बातमी शोधा

CORONA

देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत होते. प्रतिदिन रुग्ण 40 ते 50 हजारांच्या दरम्यान वाढत होते

corona updates: दिलासादायक! मागील 24 तासांत कोरोना रुग्णवाढीत घट

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत होते. प्रतिदिन रुग्ण 40 ते 50 हजारांच्या दरम्यान वाढत होते. दिलासादायक बाब म्हणजे मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 31 हजार 118 रुग्णांचं निदान झालं असून 482 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात तब्बल 94 लाख 62 हजार 810 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर एकूण मृत्यूंचा आकडा 1 लाख 37 हजार 621 वर गेला आहे.

देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत देशातील 88 लाख 89 हजार 585 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील 24 तासांत 41 हजार 985 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

लशीच्या बाबतीत भारत ‘आत्मनिर्भर’

दिल्लीत कोरोनाचा प्रसार मंदावतोय-
कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. सध्या देशात 4 लाख 35 हजार 603 रुग्ण उपचार घेत आहेत. दिल्लीत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 हजार 726 रुग्ण आढळले आहेत. तर 5 हजार 824 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवाळीनंतर दिल्लीत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला होता पण आता काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसत आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथाची पूजा; पाहा व्हिडिओ

जागतिक आरोग्य संघटना कोरोनाचा प्रसार कसा झाला याचा शोध लावणार आहे. त्यामुळे पुढे एखादी महामारी आली तर त्याचा सामना करण्यासाठी फायदा होईल, अशी माहिती WHOचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी दिली आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image