लशीच्या बाबतीत भारत ‘आत्मनिर्भर’

पीटीआय
Tuesday, 1 December 2020

जगभरात ‘कोविड-१९’ची लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत आत्मनिर्भर असल्याचे चित्र आहे. देशातील किमान पाच औषध कंपन्या लस निर्मितीत गुंतल्या असून, ‘कोविशिल्ड’ लशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे.  सरकारने कोविड -१९ लस उत्पादन आणि वितरण यंत्रणाही सुरू केली आहे.

नवी दिल्ली - जगभरात ‘कोविड-१९’ची लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना, विकसन आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत भारत आत्मनिर्भर असल्याचे चित्र आहे. देशातील किमान पाच औषध कंपन्या लस निर्मितीत गुंतल्या असून, ‘कोविशिल्ड’ लशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे. सरकारने कोविड -१९ लस उत्पादन आणि वितरण यंत्रणाही सुरू केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथाची पूजा; पाहा व्हिडिओ

देशातील लस निर्मितीवर पंतप्रधान व्यक्तीश: लक्ष ठेवून आहेत. केंद्र सरकारने ९०० कोटी रुपयांचे ‘मिशन कोविड सुरक्षा पॅकेज’ही जाहीर केले आहे. अहमदाबादमधील झायडस, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबादमधील भारत बायोटेक या तिन्ही कंपन्यांना पंतप्रधानांनी शनिवारी भेट दिली. पुण्यातील जेनोव्हा बायोफार्मा, बायोलॉजीकल ई आणि हैदराबादमधील डॉ. रेड्डीज् येथे सुरू असलेल्या स्वदेशी लस निर्मितीचाही त्यांनी आज आभासी आढावा घेतला. लस आणि तिची उपयुक्तता, वाहतूक आदींवर सोप्या भाषेत माहिती देण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मोदींचे वाराणसीतून उत्तर 

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि जेनोवा बायोफार्माला १०० देशांचे राजदूत येत्या चार डिसेंबरला भेट देणार आहेत. स्वीडनने यापूर्वीच ‘जगाची वैद्यकशाळा’ म्हणून भारताला प्रमाणपत्र दिले आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India self sufficient in terms of vaccines

Tags
टॉपिकस
Topic Tags: