corona updates:देशातील कोरोना बाधितांचा आकडा 45 लाखांच्या वर

वृत्तसंस्था
Friday, 11 September 2020

देशातील राज्यांची कोरोनाची आकडेवारी पाहिली तर,महाराष्ट्र कोरोनाने सर्वाधिक नुकसान झालेले राज्य ठरले आहे.मागील 24तासांत महाराष्ट्रात23हजार446नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले असून448रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली:भारतात कोरोनाची साथ आटोक्यात येण्याची काहीच चिन्हे दिसत नाहियेत. कारण मागील 24 तासांत देशात आतापर्यंतच्या उच्चांकी नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत 96 हजार 457 नवीन कोरोना रुग्णांची नोंद होऊन 1357 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे भारतात आतापर्यंत झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 76 हजार 277 वर गेला आहे. तर आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा  45 लाख 52 हजार 21 झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे  दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात 35 लाख कोरोनामुक्त झाले आहेत आणि सध्या 9 लाख 43 हजार 480 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील राज्यांची कोरोनाची आकडेवारी पाहिली तर, महाराष्ट्र कोरोनाने सर्वाधिक नुकसान झालेले राज्य ठरले आहे. मागील 24 तासांत महाराष्ट्रात 23 हजार 446 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले असून 448 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल एका दिवसात राज्यात 14 हजार 253 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत राज्यात 9 लाख 90 हजार 795 लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 7 लाख 715 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 61 हजार 432 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 28 हजार 282 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य प्रशासनाने दिली आहे.   

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाची बाब म्हणजे देशात कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढताना दिसतंय. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 11 लाख 63 हजार 542 चाचण्या झाल्या. कालच्या चाचण्या मिळून भारतात आतापर्यंत 5 कोटी 40 लाखांच्या वर गेल्या आहेत.  जगाचा विचार केला तर आतापर्यंत 2.8 कोटींच्या वर लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जवळपास 1.9 कोटी लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updates number of corona victims in the country is over 45 lakhs