esakal | पहिला कोवॅक्सिनचा आणि दुसरा कोविशिल्डचा डोस घेतल्यास चालतं का?

बोलून बातमी शोधा

vaccination

देशात 1 मेपासून 18 ते 45 वयोगटातील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. यासाठी कोविन अॅपवर नोंदणीही सुरु झाली आहे.

पहिला कोवॅक्सिनचा आणि दुसरा कोविशिल्डचा डोस घेतल्यास चालतं का?
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली- देशात 1 मेपासून 18 ते 45 वयोगटातील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. यासाठी कोविन अॅपवर नोंदणीही सुरु झाली आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना महामारीला आटोक्यात आणायचं असेल तर सरसकट लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. लसीकरणाला सुरु होत असल्याने लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. याच काही प्रश्नांची उत्तर आपण घेण्याचा प्रयत्न करुया.

कोणती लस जास्त प्रभावी आहे?

देशात सध्या दोन लशींच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीचा समावेश आहे. यातील दोन्ही लशी 80 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी असल्याचं सांगण्यात आलंय. पण, सध्या कोरोनापासून वाचण्यासाठी कोणत्याही लशीच्या डोस मिळत असल्यास तो घेऊन टाकावा. कारण, दोन्ही लशी कोरोना विषाणूविरोधात शरीरात अँटिबॉडी तयार करत आहेत.

हेही वाचा: लसीकरण नोंदणीसाठी भारतीयांची घाई; CoWIN सर्वर क्रॅश

पहिला कोवॅक्सिनचा आणि दुसरा कोविशिल्डचा डोस घेतल्यास चालतं का?

नाही. पहिला डोस कोवॅक्सिनचा आणि दुसरा डोस कोविशिल्डचा घेणं सुरक्षित नाही. जर तुम्ही पहिला डोस कोवॅक्सिनचा घेणार असाल तर तुम्ही दुसराही डोस तोच घ्यावा. तसेच कोविशिल्डचा पहिला डोस घेतला असेल, तर दुसरा डोसही कोविशिल्डचाच घ्या.

लहान मुलांनाही कोरोना होत आहे, मग त्यांना लस का नाही?

लहान मुलांवर लशीचे ट्रायल झालेले नाही. त्यामुळे त्यांना लस देणे सध्यातरी सुरक्षित नाही.

हेही वाचा: लस कुठे आहे? राज्यात 18-45 वयोगटातील लसीकरण खोळंबणार?

महिलांनी पिरियड्स दरम्यान लस घ्यावी का?

पिरियड्स सुरु असलेल्या महिलांनी लस घेण्यास काहीही हरकत नाही. कारण, पिरियड्स दरम्यान शरीरात होणारी प्रक्रियेशी याचं काही देणंघेणं नाही.

कोणी लस घेऊ नये?

कोरोनाच्या पहिल्या लशींच्या डोसने गंभीर एलर्जी झालेले

गर्भवती महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिला

तुमच्यात कोरोनाचे लक्षणं दिसून येत असल्यास

तुम्ही अन्य कोणत्या आजाराने पीडित असल्यास डॉक्टरचा सल्ला घ्या