Corona Vaccination: लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका

सकाळ ऑनलाइन टीम
Saturday, 16 January 2021

त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. ही सामान्य गोष्ट आहे. लस घेतल्यानंतर अर्धा तास लसीकरण केंद्रातच थांबावे लागेल.

नवी दिल्ली- देशात आजपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. या टप्प्यात लसीकरण मोफत आहे. आता लस 18 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना दिली जाणार आहे. यासाठी कोविन (Co-WIN) सॉफ्टवेअर मोबाइलवर पाठवले जाईल. लसीसाठी नोंदणीची गरज नाही. निवडणूक आयोग आणि इतर ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार सरकार स्वतः लाभार्थ्यांची निवड करेल. पहिल्या दोन टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांहून अधिक वयाची आणि आजारी रुग्णांना लस दिली जाईल. 

हलकासा ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखीची शक्यता
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही लशीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम समोर आलेले नाहीत. यामुळे हलकासा ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास उद्भवू शकतो. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या मते, असे किरकोळ दुष्परिणाम कोणतीही लस घेतल्यानंतर दिसून येतात. पण त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या फॅक्टशीटमध्ये दावा करण्यात आला आहे की, 10 टक्के लोकांना असा त्रास होण्याची शक्यता आहे. ही सामान्य गोष्ट आहे. लस घेतल्यानंतर अर्धा तास लसीकरण केंद्रातच थांबावे लागेल. सरकारच्या नियमावलीनुसार हे आवश्यक आहे. प्रतिकूल परिणाम दिसून आल्यास 1800 1200124 (24x7) या नंबरवर फोन करता येईल. 

हेही वाचा- दोन्ही कोराना लशी सुरक्षित, अफवांपासून सावध राहा; PM मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

गंभीर परिणाम झाल्यास मिळेल भरपाई
कोव्हॅक्सिन तयार करणारी कंपनी भारत बायोटेकने म्हटले आहे की, लस दिल्यानंतर कोणत्याही प्रकारचे गंभीर परिणाम दिसून आल्यास भरपाई दिली जाईल. गंभीर दुष्परिणाम दिसून आल्यास सरकारकडून अधिकृत हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातील. 

हेही वाचा- Coronavirus Vaccination : सफाई कर्मचाऱ्याला देण्यात आली कोरोनाची पहिली लस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Vaccination Do not panic if you have fever headache or body aches after vaccination