esakal | धक्कादायक! 8 कोटींच्या लसीचा ट्रक रस्त्यावर बेवारस

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! 8 कोटींच्या लसीचा ट्रक रस्त्यावर बेवारस
धक्कादायक! 8 कोटींच्या लसीचा ट्रक रस्त्यावर बेवारस
sakal_logo
By
नामदेव कुंभार

देशात तिसऱ्या टप्प्याचं लसीकरण सुरु झालं आहे. पहिल्या दिवसापासूनच लसींचा तुटवडा आहे. यातच भर म्हणून लसीकरणाच्या पुरवठ्याबाबत कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसतोय. मध्य प्रदेशमध्ये रस्त्याच्या बाजूला बेवारसपणे लसींचा ट्रक दिसून आलाय. या ट्रकमध्ये कोरोना लसीचे तब्बल दोन लाख 40 हजार डोस होते. ट्रकजवळ ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघीही हजर नव्हते.

हेही वाचा: केंद्राने आधी परदेशात लस देण्याची गरज नव्हती - उपमुख्यमंत्री

मध्ये प्रदेशमधी करेली येथे रस्त्याच्या बाजूला लस असलेल्या ट्रक आढळून आला. अज्ञात व्यक्तीनं फोन करुन याबाबतची पोलिंसाना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर तात्काळ धाव घेतली. ट्रकमधील कागदपत्रे तपासल्यानंतर ही ट्रक गुडगाव येथील टीसीआय कोल्ड चेन सॉल्युशन कंपनीचा आहे. या ट्रकमध्ये भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सीनच्या दोन लाख 40 हजार डोस होते. मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक हैदराबादवरुन पंजाबच्या करनालला निघाली होती.

हेही वाचा: लस घेतली म्हणून गाफील राहू नका; करा या नियमांचं पालन

पोलिसांनी मिळालेल्या 364 बॉक्समध्ये दोन लाख 40 हजार कोव्हॅक्सीन लस होत्या. या लसींची किंमत 8 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातेय. पोलिसांनी कंपनीच्या आधिकाऱ्यांशी संपर्क करत ड्रायव्हरच्या फोनचं लोकेशन स्ट्रेस केलं. ड्रायव्हरचा स्मार्टफोन ट्रकपासून 15 किलोमीटर दूर नरसिंहपूरजवळ झाडीत मिळाला. ड्रायव्हर आणि कंडक्टर बेपत्ता आहेत.