esakal | सावधान! लस घेतली म्हणून गाफील राहू नका; करा या नियमांचं पालन

बोलून बातमी शोधा

लस घेतली म्हणून गाफील राहू नका; करा या नियमांचं पालन
लस घेतली म्हणून गाफील राहू नका; करा या नियमांचं पालन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः मी लस घेतली आहे. त्यामुळे मी आता कोरोना विषाणूपासून सुरक्षित आहे, असे समजणे चुकीचे आहे. मात्र, सकारात्मकता आणि सद्भावना यांचा दीप आपल्या मनात नेहमी तेवत ठेवणे गरजेचे आहे. हा सल्ला दिला आहे नागपुरात आढळलेल्या पहिल्याच कोविडरुग्णाला हाताळणाऱ्या मेयो रुग्णालयातील डॉ. तिलोत्तमा पराते यांनी.

हेही वाचा: नागरिकांनो सावधान! तोतया बँक अधिकाऱ्यांचा धुमाकूळ; गोपनीय माहिती दिल्यास व्हाल कंगाल

कोविडमुळे जग बदलले, माणसं बदलली. जगण्याची, विचार करण्याची पद्धतीही बदलली. कोरोनाची भीती वाढतंच आहे मात्र आपण मानसिकदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या कणखर होणे काळाची गरज आहे. त्यासाठी आरोग्य विभाग आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. मास्क अनेकवेळा थट्टेचा विषय होतो परंतु मास्क वापरणे अतिआवश्यक आहे. कुठलेही दडपण न घेता रोजची दिनचर्या पाळा, असेही त्या म्हणाल्या

  • घरीच योगा, प्राणायाम, व्यायाम करा.

  • ताण-तणावाला दूर ठेवा, आनंदी राहा.

  • हिरव्या पालेभाज्या, फळे मिठाच्या पाण्यात धुवून घ्या.

  • व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करा.

  • आहारात कडधान्ये आवश्यक आहेत.

  • नियमितपणे हात धुणे, स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.

  • अंतराचे नियम व्यवस्थित पाळले पाहिजे.

  • गर्भवती महिलांनी व तिच्या कुटुंबीयांनी पॅनिक न होता योग्य काळजी घ्यावी.

संपादन - अथर्व महांकाळ