भारताने कोणत्या देशांना केला लशींचा पुरवठा? किती लशींची मदत केली? जाणून घ्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 5 February 2021

देशात कोरोना लसीकरणाच्या अभियानाने जोर घेतल्याचं दिसत आहे

नवी दिल्ली- भारतात कोरोना महामारीचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. दुसरीकडे देशात कोरोना लसीकरणाच्या अभियानाने जोर घेतल्याचं दिसत आहे. देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारत जगातील विविध देशांना कोरोना लशींचा पुरवठा करुन मदत करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारताने आतापर्यंत 56 लाख कोरोना डोस इतर देशांना गिफ्ट म्हणून दिलं आहे, तर एक कोटी डोस विकले आहेत. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं की, भारत कॅरेबियन देश, प्रशांत महासागरातील द्विपीय देश, निकारगुआ, अफगाणिस्तान आणि मंगोलिया या देशांना पुढील काही आठवड्यात कोरोना लशींचा पुरवठा करण्यात येईल. 

कोरोनामुळे आर्थिक परवड; झोपडपट्टीवासियांनी सुरु केली स्वत:चीच बँक

56 लाख डोसचा पुरवठा

मंत्रालयाने सांगितलं की, आतापर्यंत कोविड लशींचा पुरवठा भूतान, मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, मॉरिशस, सेशेल्स, श्रीलंका, संयुक्त अरब अमीराती, ब्राझील, मोरक्को, बहारीन, ओमान, कुवैत, इस्त्रायल, अल्जीरिया आणि दक्षिण अफ्रीका या देशांना करण्यात आला आहे. 56 लाख लशींचा पुरवठा मदत म्हणून करण्यात आला आहे, तर 1 कोटी डोस व्यावसायिक स्वरुपात देण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccine covid dose country got help from India