कोरोनाची लशीचा एकच डोस पुसेसा नाही; भारतीयांबाबत आरोग्य मंत्रालयाचा खुलासा

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 12 October 2020

'संवाद'च्या चौथ्या आवृत्तीत बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, जुलै 2021 पर्यंत भारत या लशींचे 400 ते 500 कोटी डोस तयार करेल.' आपल्याकडे एकापेक्षा अधिक लशी असणार असून त्या सर्व सुरक्षितही असतील.

नवी दिल्ली: भारतात सध्या चाचणी सुरू असलेलया लशी दोन-तीन डोसमध्ये दिल्या जातील, ही महत्वपुर्ण माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी दिली आहे. 

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी तयार केलेल्या लसीचा डोस दोनदा दिला जाईल. तर झायडस कॅडीलाने तयार केलेल्या लसीचा डोस तीन वेळेस दिला जाणार आहे. भारतात तयार होत असलेल्या बाकीच्या लसी सध्या क्लिनिकल टप्प्यात असून त्यांच्या डोसच्या काही चाचण्या करणे बाकी असल्याची माहितीही डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

'संवाद'च्या चौथ्या आवृत्तीत बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, जुलै 2021 पर्यंत भारत या लशींचे 400 ते 500 कोटी डोस तयार करेल.' आपल्याकडे एकापेक्षा अधिक लशी असणार असून त्या सर्व सुरक्षितही असतील. तसेच कोरोना व्हायरसविरुद्ध आवश्यक प्रतिकारशक्ती मिळण्यास या लसींचा फायदा होईल, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

लसीचा सिंगल डोस आणि डबल डोस बाबत आपली मते मांडताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, देशातील कोरोना लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी लसीचा एकच डोस घेणे योग्य असणार आहे.

लसींच्या वितरणाच्या नियोजनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तयार केलेली लस संपुर्ण भारतभर प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहचवणे महत्वाचे असणार आहे आणि त्याची काळजी घेणेही गरजेचे असणार आहे, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccine multiple doses and single dose desirable health minister