अभिमानास्पद! जगभरातील टॉप वैज्ञानिकांच्या यादीत 36 भारतीय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने नुकतीच एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये वेगवेगळ्या विषयात उल्लेखनिय काम केलेल्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. 

नवी दिल्ली - अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने नुकतीच एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये वेगवेगळ्या विषयात उल्लेखनिय काम केलेल्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. भारतातील 1500 वैज्ञानिक, डॉक्टर आणि इंजिनिअर यांसह यादीमध्ये एकूण 1 लाख 59 हजार 683 जण आहेत.

याबाबत आयआयटी बीएचयूचे संचालक प्रमोद कुमार जैन यांनी सांगितलं की, यादीमध्ये बनारस हिंदू विद्यापीठाच्या 14 प्राध्यापकांची नावे आहेत. या सर्वांची निवड त्यांच्या शोध निबंधाच्या आंतरराष्ट्रीय मूल्यांकनाच्या आधारावर कऱण्यात आली आहे. 

भारतीय प्राद्योगिकी संस्थान बनारस हिंदू विद्यापीठातील 14 वैज्ञानिकानी असा अंदाज व्यक्त केला की जागतिक यादीमध्ये 2 टक्के वैज्ञानिक हे स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीमधील आहेत. या यादीत आयआयटी गुवाहाटीमधील 22 प्राध्यापक आणि संशोधकांचा समावेश आहे.

हे वाचा - आत्मनिर्भर भारताची दमदार वाटचाल; भारताकडून पहिल्यांदाच 'ब्रह्मोस मिसाईल'ची निर्यात

बीएचयूमधील 14 जणांचा समावेश
जगभरातील वैज्ञानिकांच्या यादीमध्ये बनारस हिंदू विद्यापीठातील राजीव प्रकाश, प्रलय मैती, धनंजय पांडे, योगेश चंद्र शर्मा, पीसी पांडे, ब्रह्मेश्वर मिश्रा, संजय सिंह, एसके सिंह, एमएस मुतु, देवेंद्र कुमार, सुबीर दास, राकेश कुमार सिंह, ओम प्रकाश या प्राध्यापकांचा समावेश आहे. 

आयआयटी गुवाहाटीचे संचालक टीजी सीताराम आणि आयआयटी गुवाहाटीच्या फॅकल्टी मेंबर्सना 2019 च्या रिसर्च पब्लिकेशनसाठी त्यांच्या संशोधन क्षेत्रातील लाइफटाइम योगदानासाठी निवडण्यात आलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stanford university-list 36 indians researchers includes 14 professors iit bhu