
लोकांच्या तोंडावरील सैल होत चाललेले मास्क, विविध कारणांमुळे नेहमीच सोशल डिस्टन्सिंगचा उडत चाललेला फज्जा यामुळे कोरोनाच्या संसर्गाने राज्यात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.
नवी मुंबई / नवी दिल्ली - लोकांच्या तोंडावरील सैल होत चाललेले मास्क, विविध कारणांमुळे नेहमीच सोशल डिस्टन्सिंगचा उडत चाललेला फज्जा यामुळे कोरोनाच्या संसर्गाने राज्यात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. राज्याची राजधानी मुंबईप्रमाणेच मराठवाडा आणि विदर्भामध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने यंत्रणा सावध झाली आहे.
अनेक ठिकाणी जिल्हा पातळीवर स्थानिक यंत्रणेने निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबईमध्येही कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते आहे. आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट रस्त्यांवर उतरून लोकांना मास्क घालण्याचे कळकळीचे आवाहन केले. रेल्वे गाड्यांमधून विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक सण- समारंभांवरही निर्बंध घालण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संसर्गाच्या आघाडीवर
वादग्रस्त निर्णयाचा निषेध! महिला न्यायाधीशांना महिलेनंच पाठवले कंडोम
आधी दंड नंतर थेट गुन्हे दाखल करा - केंद्रेकर
औरंगाबाद - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी चिंता व्यक्त करत हा विषय गांभीर्याने घेतला आहे. संसर्ग रोखण्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे, काय उपाययोजना व तयारी करावी हे सांगून झाले. त्याच त्या गोष्टी पुन्हा सांगायला भाग पाडू नका, अशी तंबी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिली.
मुख्यमंत्र्यांचा बर्थडे; मंत्र्यानं देवीला अर्पण केली अडीच किलोची सोन्याची साडी!
या बैठकीस मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, आरोग्य, पोलिस व प्रशासन विभागाचे बडे अधिकारी उपस्थित होते. केंद्रेकर यांच्या संवादाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. केंद्रेकर यांनी परभणी, हिंगोली, बीड, नांदेड जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांची तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. परभणीचा उल्लेख करताना कलेक्टरांना दहा वेळा सांगून झाले; पण काहीच होत नाही, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कोरोना संसर्गाची स्थिती हाताळताना केंद्र सरकारने खूप दुर्लक्ष केले, सरकारला अतिआत्मविश्वास देखील नडला. या संसर्गाचे संकट अद्याप संपलेले नाही.
- राहुल गांधी, नेते काँग्रेस
Edited By - Prashant Patil