esakal | लसीकरण सुरु तरीही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली; आरोग्यमंत्री म्हणाले,बेजबाबदारपणा कारणीभूत
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus dr harsh vardhan

देशात एकीकडे लसीकरण सुरु झाले असून दुसऱ्या बाजुला मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. देशाचे आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं की, देशात एक कोटी 84 लाखांहून अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

लसीकरण सुरु तरीही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली; आरोग्यमंत्री म्हणाले,बेजबाबदारपणा कारणीभूत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारतात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. एका व्यक्तीला दोन लसीचे डोस दिले जात असून या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर असते. दरम्यान, देशात एकीकडे लसीकरण सुरु झाले असून दुसऱ्या बाजुला मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. देशाचे आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं की, देशात एक कोटी 84 लाखांहून अधिक लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तरीही देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून ही बाब चिंताजनक आहे. 

देशातील वाढत्या रुग्णसंख्येबाबात चिंता व्यक्त करताना डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं की, लोकांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नये. तसंच बेजबाबदारपणे वागू नका असंही आवाहन त्यांनी केलं. सर्वांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी  घ्यावी. आपल्याला कोरोना लसीकरण मोहिमेला एक व्यापक रुप द्यायला हवं. कोरोनाच्या काळात आयसीएमआरने केलेल्या कामाचंही आरोग्यमंत्र्यांनी कौतुक केलं. या काळात आयसीएमआरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारत आज 71 देशांना कोरोना प्रतिबंधक लस देत आहे. यामध्ये कॅनडा, ब्राझील या देशांचाही समावेश आहे. 

हे वाचा - शताब्दी एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग; दिल्ली-डेहराडून दरम्यान घडली घटना

महाराष्ट्र-केरळमध्ये 71 टक्के रुग्ण
देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे याबद्दल बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, शुक्रवारी एक लाख ९७ हजार २३७ सक्रिय रूग्णांमध्ये ७१.६९ टक्के रुग्ण केवळ महाराष्ट्र व केरळ याच दोन राज्यांत आहेत. याशिवाय गुजरात, पंजाब, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांतूनही रूग्णवाढीचे आकडे समोर आले आहेत. 

 खूशखबर ! 60 वर्षांवरील व्यक्तींना मोदी सरकार देणार महिन्याला 3000 रुपये, अशी करा नोंदणी​

देशात पहिल्या टप्प्याचे लसीकरण झालेल्यांची संख्या जवळपास 2 कोटी लोकांना लसीकरण झालं आहे. तर भारताने जगातील ७० देशांना भारतीय लसीचा पुरवठा केला आहे. ३५ देशांना एकूण ८० लाख डोस संपूर्ण निशुल्क देण्यात आले तर १८ देशांना कोव्हॅक्‍स सुविधेअंतर्गत १ कोटी ६८ लाख लसींचे डोस पाठविण्यात आल्याचे केंद्राने सांगितले.

loading image