esakal | कोरोना लाट : भारतासाठी पुढील चार आठवडे चिंताजनक; केंद्राचा गर्भित इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

corona-vaccine

भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्र सरकारने काळजी व्यक्त करत एक गर्भीत इशारा दिला आहे.

कोरोना लाट : भारतासाठी पुढील चार आठवडे चिंताजनक; केंद्राचा गर्भित इशारा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्र सरकारने काळजी व्यक्त करत एक गर्भीत इशारा दिला आहे. पुढील चार आठवडे हे भारतासाठी खूपच चिंताजनक असतील असं नीती आयोगाचे सदस्य प्रा. विनोद पॉल यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण उपस्थित होते. 

अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका, CRPF चा खळबळजनक दावा

नागरिकांना इशारा देताना प्रा. पॉल म्हणाले, "भारतात कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. सर्व गोष्टी आपल्याला गृहित धरुन चालणार नाहीत. कोरोना महामारीची परिस्थिती सध्या वाईट बनली असून कोरोनाच्या संसर्गाचा वेग हा मागील वेळेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पुढील चार आठवडे भारतासाठी अधिक चिंतेचे असतील." 

उत्तर प्रदेशात NSAचा गैरवापर; हायकोर्टानं ३२ जिल्हादंडाधिकाऱ्यांना फटकारलं 

दरम्यान, पॉल यांनी नागरिकांना आवाहन केलं की, जे लस घेण्यासाठी पात्र आहेत अशा लोकांनी नि:संशयपणे लस घ्यावी, कारण भारतात उपलब्ध असलेली लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याचबरोबर लोकांनी कोरोनाची परिस्थिती गांभीर्यानं घ्यावी असं आवाहनं करताना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन करा असं आवाहनही त्यांनी केलं.  

राज्यांना RT-PCR टेस्ट वाढवण्याच्या सूचना

दरम्यान, देशात सर्वाधिक वेगानं रुग्णसंख्या वाढणाऱ्या महाराष्ट्रात RT-PCR चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात यावं अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून हे प्रमाण कमी झाल्याचा दावा आरोग्य मंत्रालयानं केला आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात एकूण चाचण्यांपैकी केवळ ६० टक्के RT-PCR चाचण्या झाल्या आहेत. या चाचण्यांचं प्रमाण ७० टक्के आणि त्याहून अधिक करण्याच्या सूचना राज्याला देण्यात आल्याचं आरोग्य सचिव भूषण यांनी सांगितलं.

महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडची परिस्थिती काळजीत टाकणारी

भूषण म्हणाले, छत्तीसगड एक छोट राज्य असून इथल्या लोकसंख्येच्या तुलनेत सध्या वाढणारी संसर्गाचं प्रमाणं काळजीत टाकणारं असून या राज्यात देशातील एकूण कोरोनाच्या संख्येच्या तुलनेत ६ टक्के रुग्ण आहेत. तर देशातील एकूण मृत्यूंमध्ये ३ टक्के रुग्णांचे मृत्यू इथे झाले आहेत. छत्तीसगडमधील स्थिती ही दुसऱ्या लाटेमुळे अधिकच बिघडली आहे. 

तर महाराष्ट्रात देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ५८ टक्के रुग्ण आहेत. तसेच देशातील एकूण मृत्यूंपैकी ३४ टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. तसेच देशात ज्या टॉप १० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली या राज्यांतील जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पंजाब आणि छत्तीसगडमध्ये मृत्यूचं प्रमाण हे अतिउच्च प्रमाणात वाढल्याचा दावाही भूषण यांनी केला आहे.

loading image