esakal | कोरोनाची दहशत गुगलला; वर्क फ्रॉम होमच्या सूचना 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus bangalore google india updates work from home q

बेंगळुरूच नव्हे, तर पुणे, हैदराबाद, गुरुग्राम या ठिकाणीही आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कोरोनाची दहशत गुगलला; वर्क फ्रॉम होमच्या सूचना 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

बेंगळुरू Coronavirus : गुगलच्या बेंगळूरू येथील कार्यालयात एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाल्यानंतर गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झालेल्या कर्मचाऱ्याला अलग ठेवण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अब्जावधीचा तोटा
या व्यतिरिक्त कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी जे कर्मचारी कोरोना विषाणूची लागण झालेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आले होते त्यांनादेखील गुगलने अलग राहण्याची सूचना केली आहे. गुगल इंडियाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. इतर देशांप्रमाणेच भारतातही कोरोना विषाणूच्या फैलावाची भीती नायाचा नकारात्मक परिणाम होत बहुतांश उद्योग आणि कंपन्यांना अब्जावधी डॉलरचा तोटा होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी कंपन्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याच्या सूचना करत आहेत. यात ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी अॅमेझॉन आणि ट्विटरचाही समावेश आहे. दोन दिवसांआधीच माईंडट्री या आघाडीच्या आयटी कंपनीच्या एका कर्मचाऱ्यादेखील कोरोनाची लागण झाली होती.

आणखी वाचा - सरकार देशात अराजकता माजवण्याच्या प्रयत्नात : प्रकार आंबेडकर

आणखी वाचा - कोरोनामुळं आयपीएल पुढं ढकलली, वाचा सविस्तर बातमी

आयटी कंपन्यांमध्ये दहशत
बेंगळुरूच नव्हे, तर पुणे, हैदराबाद, गुरुग्राम या ठिकाणीही आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण, कंपन्यांमध्ये अनेकजण विदेशात जाऊन आलेले आहेत. त्यामुळं इतरांमध्ये भीती आहे. अनेक कंपन्यांनी कामाचा लोड कमी आहे. कंपन्यांमध्ये दर वर्षी होणारे होळी, धुळवडीचे कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आले. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईतही कंपन्यांनी अशी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गर्दीतून प्रवास टाळण्यासाठी घरातून काम करण्याच्या सूचना आहेत.