esakal | मोठी बातमी : कोरोनामुळे IPL स्पर्धा पुढे ढकलली; 'या' तारखेला होणार प्रारंभ?
sakal

बोलून बातमी शोधा

IPL-2020

या अगोदरच महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने आयपीएलचे सामने भरविण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. आता दिल्ली सरकारनेही आयपीएलचे सामने दिल्लीत खेळविण्यात येणार नाहीत, हे स्पष्ट केले.

मोठी बातमी : कोरोनामुळे IPL स्पर्धा पुढे ढकलली; 'या' तारखेला होणार प्रारंभ?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली / मुंबई : चीननंतर आता जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने प्रशासनानेही खबरदारी म्हणून कठोर निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. परिणामी, जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरवर्षीप्रमाणे यंदा नियोजित असलेली आयपीएल स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. २९ मार्चला आयपीएलला प्रारंभ होणार होता. मात्र, आता ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना संघमालकांना देण्यात आल्या आहेत. 

- Women's T20 World Cup : फायनलला गेला अन् कोरोना घेऊन आला

जगभरातील जवळपास ११० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. देशातही कोरोनाग्रस्तांची संख्या नव्वदच्या घरात गेली आहे. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी महत्त्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रेक्षकांविना आयपीएल स्पर्धा भरविण्यात यावी, अशा प्रकारची चर्चा सुरू होती.

- मोठी बातमी : यंदाच्या आयपीएलचं भविष्य टांगणीला; 'या' मुद्द्यांवर पेच कायम

तसेच १५ एप्रिलपर्यंत केंद्र सरकारने सर्व व्हिसा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परदेशी खेळाडूही भारतात येऊ शकत नाहीत. परिणामी, बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या बैठकीत १५ एप्रिलपर्यंत स्पर्धेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील सूचना येईपर्यंत आयपीएल स्पर्धा सुरू होणार नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

- इंडिया ओपन बॅडमिंटनबाबत असोसिएशनचा मोठा निर्णय; स्पर्धा होणार पण...

दरम्यान, या अगोदरच महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने आयपीएलचे सामने भरविण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. आता दिल्ली सरकारनेही आयपीएलचे सामने दिल्लीत खेळविण्यात येणार नाहीत, हे स्पष्ट केले. त्यामुळे बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

loading image