Coronavirus : भारतात कंडोमच्या खपामध्ये झाली वाढ

वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोना विषाणूचा प्रसार देशामध्ये दिवसोंदिवस वाढत असताना भारतात मागील काही दिवसांपासून आठवड्यांपासून कंडोमच्या विक्रीमध्येही झपाट्याने वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. मागील काही आठड्यापासून कंडोमची विक्री २५ ते ५० टक्क्यांनी वाढली आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रसार देशामध्ये दिवसोंदिवस वाढत असताना भारतात मागील काही दिवसांपासून आठवड्यांपासून कंडोमच्या विक्रीमध्येही झपाट्याने वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. मागील काही आठड्यापासून कंडोमची विक्री २५ ते ५० टक्क्यांनी वाढली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनेकजण कमी प्रमाणात म्हणजेच कमी संख्येने कंडोम खरेदी करतात. मात्र मागील काही आठवड्यांपासून मोठ्या आकाराची पाकीटं खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढल्याचे औषध विक्रेते सांगत आहेत. सामान्यपणे लोकं तीन कंडोमचे पाकीट घेण्याला प्राधान्य देतात. मात्र, मागील आठवडाभरापासून अधिक संख्येने कंडोम असणाऱ्या मोठ्या पाकीटांची मागणी वाढली आहे. १० ते २० कंडोम असणाऱ्या पाकिटांचा खप मोठ्याप्रमाणात वाढला आहे, असेही औषध विक्रेत्या दुकानदारांनी स्पष्ट केले आहे.

तातडीसाठी रिक्षा हवी आहे; मग या मोबाईलवर संपर्क साधा !

जे लोक आधी कंडोमचं एक पाकीट न्यायचे ते आता दोन दोन पाकीटं घेऊन जातात. या गोष्टींचा खप मागील एक दोन आठवड्यांपासून बऱ्याच प्रमाणात वाढला आहे. खासकरुन मॉल्स बंद झाल्यापासून या गोष्टी मेडिकलमधून खरेदी करण्याचे प्रमाण वाढलं असल्याचेही प्राथमिक निरीक्षण आहे. ऑफिस आणि बाजार बंद असल्यापासून कंडोमच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे.

देशातील टोलवसुली बंद; गडकरींची घोषणा

कंडोम खरेदी करणाऱ्या पुरुषांपेक्षा महिला ग्राहकांची संख्या अधिक असते. अनेक महिला आता ग्राहक कंडोम खरेदी करतात, असंही निरिक्षणास आले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ६०० चा आकडा ओलांडला. कोरोनामुळे देशभरामध्ये भितीचे वातावरण आहे. यामुळेच ग्राहकांच्या वस्तू खरेदी करण्याच्या शैलीमध्ये बदल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. म्हणजेच गरजेच्या गोष्टींचा साठा करुन ठेवण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणे यामध्ये मॉल, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, तरण तलाव यासारख्या सुविधा आठवडाभरापासून अधिक काळापासून बंद आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अनेकजण घरीच असल्याने अन्नधान्य आणि घरगुती वापराच्या वस्तूंचा साठा करण्याकडे अनेकांचा कल आहे. अशातच कंडोमच्या खपातही प्रचंड वाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Condom sales in India go through the roof